देशातील लाखो मोबाईल गेमिंगचे चाहते गेल्या एक महिन्यापासून PUBG Mobile च्या नवीन स्वरूपाची वाट बघत आहेत. KRAFTON कंपनीने देखील Battlegrounds Mobile India नावाने हा गेम पुन्हा देशात लाँच केला आणि 18 मेपासून रजिस्ट्रेशन सुरु केले. आज मात्र Battlegrounds Mobile India (BGMI) म्हणजे PUBG Mobile चा नवीन व्हर्जन भारतात डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे. हा या गेमचा बीटा व्हर्जन आहे जो अधिकृत लाँचपूर्वी डाउनलोड करून खेळता येईल. (Battlegrounds Mobile India BGMI aka PUBG mobile India download available)
बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून बीटा व्हर्जनची घोषणा केली आहे. कंपनीने आतापर्यंत गेमच्या लाँचची तारीख मात्र अजून सांगितलेली नाही. Battlegrounds Mobile India Beta व्हर्जन भारतात गुगल प्ले स्टोरवरून रोलआउट करण्यात आला आहे. हे बीटा व्हर्जन गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करता येईल, म्हणजे फक्त अँड्रॉइड मोबाईल युजर्सना या गेमचा आस्वाद अधिकृत लाँचपूर्वी घेता येईल.
इथून करा Battlegrounds Mobile India Beta डाउनलोड
Battlegrounds Mobile India Beta व्हर्जन सध्या फक्त अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध झाला आहे, हे व्हर्जन गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करता येईल. अँड्रॉइड स्मार्टफोन BGMI आपल्या फोनमध्ये इन्स्टाल कारण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - BGMI Download and Play
BGMI फोनमध्ये डाउनलोड करण्याआधी त्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही गेम डाउनलोड करण्यापूर्वी गुगल प्ले स्टोरवर जाऊन प्री- रेजिस्ट्रेशन करू शकता.
Battlegrounds Mobile India Beta ची घोषणा झाल्यानंतर अनेकांनी यात सहभाग घेतला आणि त्यामुळे नवीन युजर्सना गेम डाउनलोड करता येत नाही. असे जरी असले तरी काही गेमर्सनी TapTap अॅप वरून हा गेम डाउनलोड केला. इथून हा गेम डाउनलोड होत आहे परंतु जास्त सदस्यांनी नोंदणी केल्यामुळे हा गेम खेळता येत नाही.