Battlegrounds Mobile India (BGMI) मोबाईल गेममध्ये गणेश चतुर्थीसाठी खास इव्हेंटचे आयोजन केले आहे. या निम्मिताने डेव्हलपरने प्लेयर्सना नवीन मिशन आणि इन-गेम रिवॉर्ड्स देण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन मिशन पूर्ण करून प्लेयर्स आपल्या अवतारसाठी नवीन इन-गेम आउटफिट जिंकू शकतील. ऑगस्टमध्ये BGMI गेम डेव्हलपर Krafton ने स्वातंत्र्य दिनानिमित्त अशाच इव्हेंटचे आयोजन केले होते.
Krafton ने सोशल मीडियाच्या माध्यमातून गणेश चतुर्थी इव्हेंट आणि यातील रिवॉर्ड्सची माहिती दिली आहे. हा इव्हेंट सुरु करण्यात आला असून 21 सप्टेंबर पर्यंत यात सहभाग घेता येईल. यात तीन नवीन मिशन आहेत, जे गेममध्ये कायमस्वरूपी रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी पूर्ण करावे लागतील यातील मुख्य रिवॉर्ड्स एक जंगली हत्तीची प्रिंट असलेला टी-शर्ट आहे, जो गणेश चतुर्थीसाठी खास डिजाइन करण्यात आला आहे.
गणेश चतुर्थीचा पहिला मिशन लाईव्ह झाला आहे आणि 10 सप्टेंबर पर्यंत उपलब्ध राहील. यात गेमर्सना रोज क्लासिक मोडमध्ये 10 मीटर पोहायचे आहे. दुसऱ्या मिशन मध्ये गेमर्सना 21 सप्टेंबरपर्यंत 60 वेळा क्लासिक मोड खेळावा लागेल. शेवटच्या मिशनमध्ये मित्रांसह पाच वेळा कोणताही गेम मोड खेळावा लागेल. 15 सप्टेंबरपासून सुरु होणारे हे मिशन 21 सप्टेंबरपर्यंत अॅक्सेस करता येईल.
तिन्ही मिशन पूर्ण करणाऱ्या गेमर्सना त्यांच्या कॅरेक्टरसाठी डिजाइन करण्यात आलेला खास टी-शर्ट मिळेल. तसेच इतर व्हर्च्युअल रिवार्डस देखील मिळतील. ज्यात क्लासिक क्रेट कुपन आणि इन-गेम करन्सीचा समावेश असेल.