Battlegrounds Mobile India अजून पूर्णपणे भारतात लाँच होण्याआधीच वादात अडकला आहे. दक्षिण कोरियन गेम डेवलपर Krafton ने पबजी मोबाईलचा स्वदेशी स्वरूप बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया भारतात बीटा व्हर्जनमध्ये लाँच केला होता. परंतु आता एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि BGMI गेम तुमच्या Android डिवाइसचा डेटा चीनच्या सर्वर पाठवत आहे. टेक साइट आयजीएन इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे कि, डेटा हॉंगकॉंगमधील Tencent च्या प्रॉक्सिमा बीटा सोबत यूएस, मुंबई आणि मॉस्कोमध्ये स्थित Microsoft Azure सर्वरवर पाठवला जात आहे. (Battleground Mobile India sendig data to china claims IGN)
हा गेम अर्ली अॅक्सेसच्या माध्यमातून सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे, इतकेच नव्हे तर 50 लाख लोकांनी हा गेम डाउनलोड देखील केला आहे. या वेबसाईटने डेटा पॅकेट स्निफर अॅपचा वापर करून हि माहिती पडताळून पहिली. यातून समजले कि, एक सर्वर बीजिंगमधील चायना मोबाईल कम्युनिकेशंस कॉरपोरेशनद्वारे संचालित आहे. याव्यतिरिक्त QCloud आणि AntiCheat Expert हे दोन्ही Tencent चे सर्वर आहेत.
चीनला पाठवण्यात येणाऱ्या डेटामध्ये गेमर्सच्या डिवाइस डेटाचा समावेश होता. क्राफ्टनच्या बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाच्या अटींनुसार गेमर्सची खाजगी माहिती भारतीय सर्वर ठेवण्यात येईल. “कायदेशीर आवश्यकता” पूर्ण करण्यासाठी तुमचा डेटा दुसऱ्या देशांमध्ये देखील पाठवला जाऊ शकतो, असे देखील कंपनीच्या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. कदाचित याच अटींचा वापर कंपनी डेटा देशाबाहेर पाठवण्यासाठी करत असावी.
Battlegrounds Mobile India चे बीटा व्हर्जन अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी उपलब्ध झाला आहे. 17 जून रोजी डेव्हलपर क्रॉफ्टनने हा गेम भारतातही अँड्रॉइड युजर्ससाठी अर्ली अॅक्सेसच्या माध्यमातून प्ले स्टोरवर उपलब्ध केला होता. आता कंपनीने सांगितले आहे कि या बीटा व्हर्जनचे फक्त दोन दिवसांत 50 लाख डाउनलोड पूर्ण झाले आहेत. 50 लाख डाउनलोड पूर्ण झाल्यामुळे गेममध्ये प्लेयर्सना रिवॉर्ड्स देण्यात आले आहेत. आता प्लेयर्सना क्लासिक क्रेट कुपन देण्यात आले आहेत. तर 1 कोटी डाउनलोडनंतर कॉन्स्टेबल सेट रिवॉर्ड म्हणून देण्यात येईल.