बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडियाच्या भारतातील लाँचची तारीख अधिकृतपणे समोर आली नाही परंतु गेमच्या लाँचची घोषणा झाली आहे. गुगल प्ले स्टोरवर गेमचे प्री रेजिस्ट्रेशन देखील सुरु आहे. गेमच्या डेव्हलपर कंपनी Krafton ने गेमप्ले, प्री रेजिस्ट्रेशन केल्यावर मिळणारे रिवॉर्ड्स आणि प्रायव्हसी पॉलिसीची देखली माहिती दिली आहे. परंतु, लाँच डेटची माहिती अजून देण्यात आली नाही. आता अनेक लिक्समधून समोर येत आहे कि हा गेम 18 जून, 2021 रोजी भारतात पुनरागमन करेल. (Battlegrounds mobile india will launch in India on 18 June)
अलीकडेच पबजी मोबाईल इन्फ्लुएन्सर सागर ठाकुर याने बायनरी कोडच्या माध्यमातून सांगितले कि Battlegrounds Mobile India भारतात 18 जूनला लॉन्च केला जाऊ शकतो. यापूर्वी पण अनेक टिप्स्टर्सनी पबजीच्या भारतीय अवताराबाबत माहिती दिली होती. परंतु त्यातून आता वारंवार हि एकच तारीख समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या टीजर्समधून समजले होते कि, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियामध्ये प्लेयर्सना Level 3 Backpack मिळेल, जी गेममधील सर्वात मोठी बॅकपॅक आहे. त्याचबरोबर अशी माहिती समोर येत आहे कि बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया 2जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोन्सवर पण खेळता येईल. तसेच हा गेम खेळण्यासाठी मोबाईलमध्ये Android 5.1.1 किंवा त्यापेक्षा वरची ऑपरेटिंग सिस्टम असणे आवश्यक आहे.
डेटा सिक्योरिटीचे काय?
गेल्यावर्षी पबजीवर भारतात बंदी घालताना भारत सरकारने डेटा सिक्युरिटी आणि प्रायव्हसी हि कारणे सांगितली होती. यावेळी डेटा सिक्योरिटी आणि प्रायव्हसीबाबत भारत सरकारच्या नियमांचे पालन आपण करत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाच्या लाँचला काही प्रमाणत विरोध देखील झाला होता. दरम्यान, भारतातील गेमर्स मात्र खूप उत्साही असल्याचे चित्र दिसत आहे.