नवी दिल्ली - स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. सध्या प्रत्येक जण मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर करीत आहे. दिवसभर फोनचा वापर केल्यानंतर याची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे तुम्हाला वारंवार फोन चार्ज करावा लागतो. मात्र काही जण फोन चार्ज करताना अशा काही चुका करीत असतात. त्यामुळे फोनचं मोठं नुकसान होतं. तसेच चुकीच्या पद्धतीने चार्ज केल्याने फोनच्या बॅटरीवर देखील परिणाम होतो. कोणत्या चुका टाळाव्या हे जाणून घेऊया...
ओरिजनल चार्जरचा करा वापर
फोनची बॅटरी खऱाब होऊ नये आणि तो खूप जास्त वेळ चालावा असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या स्मार्टफोनला नेहमी ओरिजनल चार्जरनेच चार्ज करा. जर तुम्ही दुसऱ्या चार्जरने किंवा लोकल चार्जरने फोन चार्ज केल्यास त्याचा परिणाम बॅटरीवर पडू शकतो. वारंवार अन्य चार्जरने फोन चार्ज केल्यास फोनची बॅटरी खराब होऊ शकते.
सतत चार्ज करू नका
काही लोक आपला फोन हा सतत चार्ज करतात. बॅटरी 90 टक्के असल्यावरही ते चार्ज करतात. स्मार्टफोनला वारंवार चार्ज केल्याने त्याचा परिणाम बॅटरीवर पडत असतो. त्यामुळे फोनला वारंवार चार्ज करणं टाळावं.
बॅटरी 20 टक्के झाल्यानंतर फोन करा चार्ज
फोनची बॅटरी जर 20 टक्के झाली किंवा त्यापेक्षा कमी झाल्यानंतर फोनला चार्ज करणे चांगले आहे. त्यामुळे फोनच्या बॅटरीवर कोणताही परिणाम होत नाही.
कवरशिवाय चार्ज करा फोन
अनेकदा लोक कवरसोबत फोन चार्जिंगला लावतात. असं करू नका. मोबाईल कवर सोबत चार्जिंग केल्याने फोनच्या बॅटरीवर दाब पडतो. तसेच बॅटरी खराब होण्याची देखील भीती असते. त्यामुळे फोन चार्ज करत असताना कवर काढून टाका.
चार्जिंग App पासून राहा दूर
अनेकदा फोनला लवकर चार्ज करण्यासाठी आपण फास्ट चार्जिंग App ला डाउनलोड करतो. खरं म्हणजे, हे App फोनच्या बॅकग्राउंडला लागोपाठ चालत असतात. त्यात बॅटरी जास्त खर्च होते. त्यामुळे फोनच्या बॅटरीला सुरक्षित ठेवायचे असल्यास अशा App पासून दूर राहा.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....