शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

फेसबूकवर व्हायरल होतोय 'Sarahah', ओळख लपवून पाठवू शकता तुमचा संदेश

By शिवराज यादव | Published: August 12, 2017 11:21 AM

आतापर्यंत जवळपास 50 लाख लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे.

ठळक मुद्देया अॅपच्या सहाय्याने तुम्ही तुमची ओळख उघड न करता कोणालाही संदेश पाठवू शकता आतापर्यंत जवळपास 50 लाख लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहेसौदीमधील जैनुल आबेदिन या व्यक्तीने हे अॅप डेव्हलप केलं आहे

मुंबई, दि. 12 -  फेसबूकवर सध्या काही पोस्ट तुम्हाला पाहायला मिळत असतील, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने आपल्यासंबंधी लिहिलेली एखादी पोस्ट शेअर केली असेल. त्या पोस्टखाली पाहिलंत तर तुम्हाला 'Sarahah.com' असं लिहिलेलं दिसेलं. हा नेमका काय प्रकार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्या माहितीसाठी हे एक अॅप असून प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत जवळपास 50 लाख लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. युजर्समध्ये या अॅपची क्रेझ वाढत चालली असून येणा-या काही दिवसांमध्ये फेसबूकवर अशा पोस्टचा भडिमार पडला तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. 

या अॅपची सर्वात भन्नाट गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची ओळख उघड न करता कोणालाही संदेश पाठवू शकता. समोरच्या व्यक्तीला तुम्ही पाठवलेला मेसेज मिळेल, मात्र तो कोणी पाठवला हे कळणार नाही. अनेकदा एखाद्या व्यक्तीशी काहीतरी बोलायचं असतं, पण भीतीपोटी भावना व्यक्त होत नाहीत. अशा लोकांसाठी हे अॅप खूप फायद्याचं ठरत आहे. सौदीमधील जैनुल आबेदिन या व्यक्तीने हे अॅप डेव्हलप केलं आहे. 

तुम्हालाही Sarahah वापरायची इच्छा असेल तर सर्वात आधी त्यांच्या वेब प्लॅटफॉर्मवर जाऊन एक अकाऊंट बनवावं लागले. नाहीतर तुम्ही गुगल प्ले स्टोअरमधून किंना अॅपलच्या अॅप स्टोअरमध्ये जाऊन Sarahah अॅप डाऊनलोड करु शकता. या अॅपची iOS फाईल 22MB तर अॅड्रॉइडची अॅप साईज 12MB इतकी आहे. अनेक युजर्सनी या अॅपचं कौतुक केलं आहे, तर काहींना मात्र हे खटकत आहे. अनेकजण तर याचा वापर आपला राग काढण्यासाठी करताना दिसत आहेत. 

कसा करायचा वापर ?अॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वात आधी अकाऊंट तयार करा. त्यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये आलेली मेसेज लिंक आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर करा. यानंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला आपोआप मेसेज मिळण्यास सुरुवात होईल. मात्र हे मेसेज तुम्हाला कोण पाठवत हे गुपीतच राहणार आहे. आणि हेच या अॅपचं वैशिष्ट्य आहे. 

हे अॅप ज्याप्रमाणे भावना व्यक्त करण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म आहे, त्याचप्रमाणे याचे काही साईड इफेक्ट्सदेखील आहेत बरं का...म्हणजे यावर अनेक तरुण, तरुणी आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसत आहे. तशी यामध्ये काहीच अडचण नाही, मात्र जर तुम्ही विवाहित असाल तर मात्र हा साईड इफेक्ट असू शकतो. अनेकजण तर नोकरी मागत आहेत. काहीजण आपल्या बॉसला तुम्ही इतके खडूस का आहात ? असा प्रश्न विचारत आहेत. याचा फायदा सेलिब्रेटिंनाही होत आहे. 

डाटा चोरी होण्याची शक्यतासायबर एक्स्पर्ट आणि डाटा सेक्युरिटी क्षेत्रातील संबंधितांनी या अॅपमुळे सुरक्षेला धोका होण्याची भीती नाकारली जाऊ शकत नाही. हे अॅप फक्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचण्याची परवानगी जरी मागत असलं तरी यामुळे डाटा चोरी होण्याचं संकट येऊ शकतं. फक्त मौज-मजा म्हणून या अॅपसोबत जोडलं जाणं धोक्याचं ठरु शकतं असा दावा तज्ञांनी केला आहे.