शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

कृत्रिम बुद्धिमत्तेचा युगारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 6:37 AM

डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत मानवी शरीर, सवयी आणि जीवनपद्धतीच्या उत्क्रांत टप्प्यावर येऊन थांबला, तरी मन, विचार, बुद्धी आणि सर्जन या अंतरंगी गुणांच्या बळावर प्रतिसृष्टीचा ध्यास घेतलेल्या मानवाने, आज कृत्रिमरीत्या मानवी मेंदू निर्मितीचा टप्पा गाठला आहे.

संकलन: ओंकार करंबेळकररेखाचित्र : अमोल ठाकूरडार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत मानवी शरीर, सवयी आणि जीवनपद्धतीच्या उत्क्रांत टप्प्यावर येऊन थांबला, तरी मन, विचार, बुद्धी आणि सर्जन या अंतरंगी गुणांच्या बळावर प्रतिसृष्टीचा ध्यास घेतलेल्या मानवाने, आज कृत्रिमरीत्या मानवी मेंदू निर्मितीचा टप्पा गाठला आहे. संगणकाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेने आपल्या आयुष्यात शिरकाव केला आहेच; यापुढचा काळ याच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा असल्याने, तो अधिक आव्हानात्मक असेल की सुखकारक? यावर जगभरात चर्चा सुरू झाली आहे. २१व्या शतकात तंत्रज्ञानाच्या विकासाने जाती-धर्माच्या भिंती गळून पडतील आणि मानव अधिक वैश्विक होईल, असे भाकित वर्तविले गेले होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे चालते-बोलते उदाहरण असलेल्या ‘सोफिया’ नावाच्या यंत्रबाहुलीला ‘नागरिकत्व’ बहाल करून, त्या दिशेने एक पाऊल पडले आहे. महर्षी व्यासांनी कल्पिलेल्या या कलियुगात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे अनेक ‘कल्की’ अवतार येऊ घातले आहेत!अकआर्टिफिशिअल इंटेलिजन्स इसेन्शिअल लाइफ पार्टनर‘तुझ्यावाचून जमेना, तुझ्याविना करमेना!’ असा ‘इसेन्शिअल लाइफ पार्टनर’ बनत चाललेला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात, कृत्रिम बुद्धिमत्ताही आता आपला अविभाज्य भागबनली आहे. येत्या वर्षांत त्याचेअनेक फायदे दिसून येणार आहेत.आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असणारे रोबोट अल्गोरिदमच्या मदतीने काम करतात. मानवाचा मेंदू ज्या गतीने आकडेमोड करू शकतो. त्याच्या हजारो पटीने नवे रोबोट हे काम करतील. त्यातून सर्व प्रकारच्या डेटाचे वर्गीकरण काही सेकंदात होईल. याचा उद्योग क्षेत्राला फायदा होईल.डेटा मॅनेजमेंटक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वाधिक उपयोग होईल. माहिती गोळा करणे, त्याचे वर्गीकरण आणि निर्णय घेणे, यासाठी त्याचा फायदा होईल. उदाहरणार्थ :आरोग्य क्षेत्रामध्ये माहिती गोळा करून त्याची वर्गवारी करणे, त्यानंतर उपाययोजना सुचविणे, त्या अंमलात आणण्यासाठी मदत करणे ही प्रक्रिया सोपी होईल.सायबर क्षेत्रातील हॅकिंगसारखे गुन्हे आटोक्यात आणण्याच्या माणसाच्या गतीपेक्षा कितीतरी अधिक वेगाने हे तंत्रज्ञान काम करू शकेल.अचूक निर्णय आणि अचूक प्रक्रियेसाठी या तंत्राचा वापर करता येऊ शकेल. तेलाचे उत्खनन, अंतराळ विज्ञान या क्षेत्रांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा उपयोगहोईल.आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे आजचे सर्वात जास्त वापरातले यंत्र म्हणजे स्मार्टफोन. पत्ता शोधणे, वस्तूंमधील, रस्त्यांमधील योग्य निवड करण्यासाठी याचा उपयोग होतो.अल्गोरिदमच्या आधारावर वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी हे रोबोट मदत करु शकतात. तसेच रुग्णाच्या आरोग्याबाबत निर्णयही अल्गोरिदमच्या मदतीने घेण्यास रोबोट मदत करतील.बहुतांश वेळेस तर्काधारीत विचारांवर मानवी भावनांचा परिणाम होतो. त्यामुळे मानवी भावनाविरहित यंत्र असे तर्कसुसंगत निर्णय घेण्यासाठी वापरले जाऊ शकते.रोबोटिक्स पेट आजारी माणसाचे मनोरंजन व त्याला बरे वाटण्यासाठी मदत करू शकतात.संरक्षण क्षेत्रामध्ये सध्या रोबोटीकचा वापर करण्याची गरज लक्षात घेवून तशा प्रकारचे संशोधन केले जात आहे. रोबोटस् स्वत:च निर्णय घेऊन संरक्षणाची जबाबदारी पार कसे पाडतील यासाठी एआयचा वापर होऊ घातला आहे.सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, धोकादायक समजल्या जाणाºया क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असणाºया रोबोटचा वापरहोईल. मानवी जीवनाला असणारा धोकाही यामुळे कमी होईल.येत्या काळात एखाद्या ग्रहावर पाठविण्यात येणाºया यानासोबत स्वत:चा मेंदू असलेल्या म्हणजेच निर्णयक्षमता असलेला यंत्रमानव पाठविण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. मानवाला धोका न पोहोचवता अंतराळातील माहिती मिळवायची आणि ती जगाला द्यायची यासाठीही मोठ्या जोमात संशोधन केले जात आहे.बोटांपासून मेंदूपर्यंत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सआता अँड्रॉइड फोनमध्ये एखाद्याला फोन करायचा असेल, तर त्याचे नाव लिस्टमध्ये शोधण्याऐवजी मोठ्याने ‘कॉल’ असे म्हणून त्या व्यक्तीचे नाव घेतले, तरी फोन आपोआप त्या व्यक्तीला फोन लावून देतो. जर त्या नावाची माणसे असतील, तर नक्की कोणती व्यक्ती हवी आहे, असे विचारून, मग उत्तरानुसार योग्य व्यक्तीशी संपर्क करण्यासाठीही फोन मदत करतो.मानवी मेंदू ही एक जटिल नेटवर्किंग प्रणाली मानली जाते. तशी प्रणाली कृत्रिमरीत्या तयार करणे हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे अंतिम ध्येय आहे. अर्थात, तेथे पोहोचायला अजून फारच अवधी लागणार आहे आणि त्यासाठी मोठे संशोधनही करावे लागणार आहेत. मात्र, थोड्या-थोड्या तुकड्यांमध्ये आपल्या आयुष्यात फोन, संगणकाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेने आपल्या आयुष्यात शिरकाव केला आहे. याचा थोडा-फार अनुभव तुम्हाला फेसबुक, गुगल सर्च किंवा जीमेल वापरताना आला असेल.फेसबुकवर तुमचे मित्र, तुमची आवड, सतत सर्च करण्याचे विषय पाहून 'तुमचे हेदेखील मित्र असू शकतात' किंवा 'यांना तुम्ही ओळखत असाल,' अशी यादी तुमच्यासमोर फेसबुक ठेवते किंवा गुगलच्या न्यूज विभागात तुम्ही सतत काही ठरावीक विषयांच्या बातम्या शोधत असाल, तर 'युअर फेव्हरेट' अशा एखाद्या नावाखाली तुम्ही नेहमी पाहात असलेल्या बातम्या आज्ञा न देता तयार करून देते.तसेच आता तुमच्या ईमेलमधील मजकुरानुसार तुमचे संभाव्य उत्तर काय असू शकेल याचा अंदाज घेऊन, ३ प्रकारच्या शक्यता जी-मेल तयार स्वरूपात उपलब्ध करून देते. उदाहरणार्थ, तुमच्या मित्राने उद्या अमुक एका जागी, संध्याकाळी अमुक नाटक आहे असा ईमेल पाठविला, तर त्या ईमेलला तुमची संभाव्य उत्तरे काय असू शकतात, याचे ३ तयार लहान ड्राफ्ट गुगल देते.तुमच्या मित्राच्या प्रश्नाला ईमेलवरून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, मी नाटकाला नक्की येईन, मी नाटकाला येऊ शकणार नाही, अशी ३ तयार उत्तरे गुगल देऊ शकते किंवा एखादा संदेश ईमेलमध्ये किंवा मोबाइलवर लिहिताना स्पेलिंग दुरुस्त करण्याबरोबर योग्य शब्दही सुचविण्याचे काम हे तंत्रज्ञान करत असते.असे तुकड्या-तुकड्यांमध्ये आर्टिफिशिअलइंटेलिजन्स आपल्याकडे आधीच आलेले आहे.अ‍ॅलेक्सा ते सोफिया... आभासी मदतनीसअ‍ॅलेक्सा : गुड मॉर्निंग.मी : अ‍ॅलेक्सा, इट्स एटओ क्लॉक, आय अ‍ॅम लेट टुडे.अ‍ॅलेक्सा : यू हॅव ५ इव्हेन्ट्सस्केड्युल्ड टुडे.मी : अ‍ॅलेक्सा टी बॅग्जआर अलमोस्ट एम्प्टी.अ‍ॅलेक्सा : ओके आॅर्डर प्लेस्डसर फॉर टी बॅग्ज.मी : अ‍ॅलेक्सा, वूड यूप्लीज टेल मी वेदर स्टेटस.अ‍ॅलेक्सा : 20 डिग्रीज, देअरइज वन हंड्रेड चान्स आॅफ शावर्स टुडे.मी : अ‍ॅलेक्सा, प्लीज टर्न आॅन माय टीव्ही, प्लीज प्ले सम रॉक अल्सो...या सकाळपासून रात्री झोपण्यापर्यंत किंवा चोवीस तास अखंड चालू असणाºया संवादातील अ‍ॅलेक्सा कोणी मैत्रीण, बायको किंवा मोलकरीण नाही. अ‍ॅमेझॉनने तयार केलेल्या इको आणि गुगलच्या होम या लंबगोल स्पीकरसारख्या दिसणाºया यंत्रांनी (यांत्रिक सहकारिणींनी) काही घरांमध्ये प्रवेश केला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली सगळी कामे अ‍ॅलेक्सावर सोपवायची आणि निर्धास्त व्हायचे. तुमचे एकेक काम अ‍ॅलेक्सा चुटकीसरशी हातावेगळे करत राहाते. एके काळी तो जादूचा चिराग घासल्यावर अल्लाउद्दीनला कामे करणारा राक्षस मिळाला होता किंवा ‘आय ड्रीम आॅफ जिनी’ नावाची साठच्या दशकातील अमेरिकेतील टीव्ही मालिका आपल्याकडेही हिंदीतून प्रसारित झाली होती. याच दशकात ‘बिविच्ड’ नावाची मालिका अमेरिकेत दाखविण्यात आली होती. जादूच्या शक्तीने आपल्या नवºयाला कधी अडचणित आणणारी, तर कधी संकटातून सोडविणाºया पत्नीची कल्पना अमेरिकन लोकांना भारी आवडली होती. इतकेच काय, ८०च्या दशकामध्ये 'स्मॉलवंडर' मालिकेतली ‘विकी’ नावाची रोबोट मुलगी तुम्हाला आठवत असेल. एके काळी केवळ विज्ञान कादंबºया आणि सिनेमातल्या या गोष्टी आता प्रत्यक्षात उतरल्या आहेत.‘सिरी’ आली आयुष्यातअ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅलेक्सासारख्या आयफोनमधल्या सिरीच्या रूपाने आपल्या आयुष्यात सगळी कामे करणाºया अदृश्य व्यक्तींचा प्रवेश झाला आहे. आयफोनच्या या सिरीला तुम्ही कोणत्याही आज्ञा देऊ शकता, कामे सांगू शकता किंवा प्रश्न विचारू शकता. हे... सिरी, आता माझ्या फोनमध्ये कोणाचे मेसेजेस आले आहेत? असतील, तर मला वाचून दाखवतेस का? असे म्हटल्यावर त्या व्यक्तीचे संदेश ही सिरी तुम्हाला वाचून दाखविते. ते ऐकल्यावर तुम्ही अमुक उत्तर त्याला दे, असे म्हटल्यावर,ती परस्पर त्याला उत्तर देऊन टाकते.तुम्हाला एखाद्या भेटीसाठी उशीर होत असेल, तर त्याला मला १५ मिनिटे उशीर होईल, असे सांग म्हटल्यावर, ती परस्पर त्याला मेसेज देऊन मोकळी होते. त्यासाठी तुम्हाला गाडी चालविताना फोन हातात घेण्याची किंवा संदेश टाइप करण्याची गरज नाही. जणू मित्राशी किंवा मैत्रिणीशी गप्पा माराव्यात, त्या पद्धतीने हा संवाद करता येतो. हे सिरी, मला एक विनोद सांग, असे म्हटले, तरी ती एखादाजोक तुम्हाला सांगते.अशी सुरू होते यंत्राची मदत...एखादे काम करायला लागले, ते टाळता कसे येईल, ते टाळता येणे शक्य नसेल, तर कमीतकमी त्रासामध्ये किंवा कमी कष्टात कसे होईल, सोपे कसे होईल, याचा माणूस विचार सुरू करतो.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान