युजर्सना टिकवून ठेवण्यासाठी तसेच नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय टेलिकॉम कंपन्या सतत नवनवीन प्लॅन्स आणि ऑफर्स सादर करता असतात. अलीकडेच Reliance Jio, Airtel आणि Vi या टेलिकॉम कंपन्यांनी डेली डेटा लिमिट नसलेले प्लॅन्स सादर करण्यास सुरुवात केली आहे. आज आपण या तिन्ही कंपन्यांच्या या प्लॅन्सची माहिती घेणार आहोत, जे कोणत्याही डेली डेटा लिमिटविना सादर करण्यात आले आहेत.
डेली डेटा लिमिट नसणारे Jio प्लॅन
Jio ने डेली डेटा लिमिट नसणारे 5 प्लॅन्स सादर केले आहेत. या प्लॅनमध्ये मिळणार डेटा तुम्ही प्लॅनच्या वैधतेपर्यंत वापरू शकता. तसेच या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, प्रतिदिन 100 मोफत SMS आणि JioTV, Jio Cinema, Jio News इत्यादी जियो अॅप्सचे मोफत सब्स्क्रिप्शन मिळते. या प्लॅन्सची किंमत आणि मिळणारा डेटा पुढील प्रमाणे:
- 127 रुपयांचा प्लॅन 15 दिवसांची वैधता 12GB डेटा
- 247 रुपयांचा प्लॅन 30 दिवसांची वैधता 25GB डेटा
- 447 रुपयांचा प्लॅन 60 दिवसांची वैधता 50GB डेटा
- 597 रुपयांचा प्लॅन 90 दिवसांची वैधता 75GB डेटा
- 2397 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांची वैधता 365GB डेटा
डेली डेटा लिमिट नसणारा Airtel चा प्लॅन
Airtel ने 456 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन 60 दिवसांच्या वैधतेसह सादर केला आहे. यात कोणत्याही डेली लिमिटविना 50GB डेटा आणि रोज 100 एसएमएस मिळतात. त्याचबरोबर ग्राहकांना अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ मोबाईलचे एक महिन्याचे सब्स्क्रिप्शन, एयरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम, फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूजिक, शॉ अकादमीचे एक वर्षाचे सब्स्क्रिप्शन, अपोलो 24/7 सर्कल आणि 100 रुपये फास्टॅग कॅशबॅक असे बेनिफिट्स देण्यात येत आहेत.
डेली डेटा लिमिट नसणारा Vi चा प्लॅन
Vi ने आपल्या ग्राहकांसाठी 447 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन 60 दिवसांच्या वैधतेसह सादर केला आहे. यात 50GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज मोफत 100 एसएमएस असे फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये विआय मूवीज आणि टीव्हीचा मोफत अॅक्सेस देखील देण्यात आला आहे.