तुमच्याकडे कोणता स्मार्टफोन आहे? तो भारतातील बेस्ट सेलिंगच्या लिस्टमध्ये आहे का? आम्ही तुम्हाला सर्वाधिक खपाचे फोन सांगणार आहोत. ग्लोबल टेक्नोलॉजी मार्केट रिसर्च फर्म काऊंटरपॉईंट रिसर्चने ही यादी जारी केली आहे.
गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत सर्वाधिक विक्री होणारे फोन कोणते ते दिले आहेत. Apple iPhone 13 ला लोकांनी खूप पसंती दिली आहे. Apple iPhone 13 या कालावधीत सर्वाधिक विक्री होणारा फोन ठरला. त्याचा बाजारातील हिस्सा ४ टक्के होता. तर Samsung Galaxy M13 दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याचा बाजारातील हिस्सा 3 टक्के होता.
Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi ने देखील या यादीत स्थान मिळवले आहे. Xiaomi Redmi A1 तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याचा बाजारहिस्साही ३ टक्के होता. Samsung Galaxy A04s चौथ्या आणि Realme C35 पाचव्या स्थानावर आहे.
आयफोन 13 भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणारा फोन बनण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारण भारतीय बाजारपेठ बजेट फोनसाठी ओळखली जाते. यापूर्वी ही यादी बजेट फोन्सची असायची. iPhone 13 वर बंपर डिस्काउंट आणि ऑफर दिल्या जात होत्या. ज्याचा फायदा या फोनच्या विक्रीला झाला आहे. या फोनमध्ये A15 Bionic चिपसेट देण्यात आला आहे, जो iPhone 14 मध्ये देखील वापरला गेला आहे. यात 12-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.