नवी दिल्ली - देशात सर्वच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त किमतीत इंटरनेट सेवा देत आहेत. मात्र स्मार्टफोमध्ये नेटवर्क समस्या आल्यास युजर्सना वाय-फायची गरज भासते. प्रामुख्याने रेल्वे स्टेशन आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा देण्यात येते. मात्र बऱ्याचदा कोणत्या ठिकाणी वाय-फाय सेवा उपलब्ध आहे हे माहिती नसल्याने इंटरनेटचा वापर करता येत नाही. त्यामुळे मोफत वाय-फाय कसे शोधायचं? त्यासाठी कोणत्या ट्रिक्स आहेत हे जाणून घेऊया.
WeFi - गूगल प्ले स्टोरमध्ये असलेलं वेफी अॅप तुम्हाला तुमच्या आजुबाजूला असलेल्या वाय-फायची माहिती देतं. जर हे अॅप तुमच्या फोनमध्ये असेल तर ते आपोआप फोनमध्ये कनेक्ट होतं.
Facebook - काही दिवसांपूर्वी फेसबुकने युजर्ससाठी एक वाय-फायचं फीचर दिलं आणलं होतं. या फीचरच्या माध्यमातून युजर्स मोफत वाय-फायचा शोध घेऊ शकतात. यासाठी अॅपवर असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. क्लिक केल्यावर Find Wi-Fi चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास तुमच्या जवळपास असलेल्या मोफत वाय-फायची एक लिस्ट दिसेल.
Instabridge - इन्स्टाब्रिज या अॅपच्या माध्यमातून युजर्स मोफत वाय-फाय सोबत अगदी सहज जोडले जातात. सर्वात जलद नेटवर्कसोबत कनेक्ट होणे ही अॅपची खासियत आहे. जर नेटवर्क मिळालं नाही तर हे अॅप ऑटो मोबाईल नेटवर्क जाऊन कनेक्टाव्हीटी ठेवतं.