शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

व्हॉट्सॲपवर इंटरनॅशनल कॉलपासून सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2023 10:18 AM

सायबर गुन्हेगारीचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे.

सायबर गुन्हेगारीचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲपवर अनोळखी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल तसेच मेसेज येण्याचे प्रमाण वाढले असून त्याद्वारे लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर येत आहे. अनेक जण स्पॅम कॉल्सच्या तक्रारी करत असल्याने अलीकडेच सरकारनेही या नवीन व्हॉट्सॲप घोटाळ्याची दखल घेतली. तर, व्हॉट्सॲपही अशा घटना कमी करण्यासाठी आपल्या एआय आणि एमएल सिस्टमला अधिक स्ट्राँग बनवित आहे.

काय करावे?

अशा क्रमांकावरून आलेले मेसेज किंवा कॉल आणि अगदी मिस्ड कॉल्सलाही प्रतिसाद देणे पूर्णपणे टाळा. 

अनोळखी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल, मेसेज प्राप्त होताच त्यांना ब्लॉक करणे आणि रिपोर्ट करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. व्हॉट्सॲपमध्येच हा पर्याय उपलब्ध आहे.

अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही मेसेज किंवा लिंकवर चुकूनही क्लिक करू नका, त्यात तुमचा डेटा किंवा पैसे चोरण्यासाठी काही प्रकारचे मालवेअर असू शकतात. हॅकर किंवा स्कॅमर तुमचे पैसे चोरण्यासाठी तुम्हाला फसवू शकतात.व्हॉट्सॲप अकाउंटसाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन सेटअप करावे. असे केल्यास तुमच्या खात्यात लॉगिन करताना पासवर्डशिवाय व्हेरिफिकेशन कोड देखील आवश्यक असतो.

प्रोफाइल फोटो, स्टेटस, लास्ट सीन आदींच्या सेटिंग्समध्ये बदल करून फक्त तुमच्या संपर्क यादीतील लोकांसाठीच ते दिसेल किंवा कोणालाच दिसणार नाही असा पर्याय निवडा. 

अन्यथा कोणीही तुमच्याबद्दलची बरीच माहिती मिळवू शकतो.

स्पॅम काय?

पार्ट टाइम जॉब किंवा पैसे कमावण्याच्या विविध ऑफर्स देऊन आणि रग्गड लॉटरी अथवा जॅकपॉट जिंकल्याचे खोटे आमिष दाखवून गंडा घालणे. तसेच, न्यूड फोटो- व्हिडीओंद्वारे ब्लॅकमेलिंगही होऊ शकते.

कोणत्या क्रमांकावरून कॉल  

हे कॉल्स इंडोनेशिया (+६२), व्हिएतनाम (+८४), इथिओपिया (+२५१), मलेशिया (+६०), केनिया (+२५४), आणि यांसारख्या वेगवेगळ्या देशांचे आहेत.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपfraudधोकेबाजी