एअरटेल (Airtel), जिओ (Jio) आणि व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या, त्यानंतर लोकांना महागाईचा फटका बसला होता. आता कंपन्या हळूहळू कमी किमतीच्या योजना आणत आहेत. आता एअरटेलने देशभरातील आपल्या युजर्ससाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन आणला आहे. हा प्लॅन युजर्ससाठी OTT फायदे देखील देतो. तसेच, एअरटेलच्या या प्लॅनवर युजर्संना भरपूर डेटासह मिड-टर्म व्हॅलिडिटी मिळते आणि यामुळेच जास्त डेटा युजर्ससाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
एअरटेलचा 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन नुकताच सादर करण्यात आला आणि हा एक मोठा डेटा प्लॅन आहे, जो युजर्संना मिड-टर्म व्हॅलिडिटीच्या पर्यायासाठी केंद्रित आहे. एअरटेलच्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 2.5GB रोजच्या डेटासह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. युजर्संना या प्लॅनसह ओव्हर-द-टॉप (OTT) फायदे देखील मिळतात.
99 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळतात अनेक फायदे!सर्वात आधी यामध्ये 84 दिवसांच्या Amazon प्राइम मेंबरशिपचा समावेश आहे, जो तुम्हाला प्राइम व्हिडिओ, प्राइम म्युझिक आणि इतर Amazon प्राइम अॅप्सच्या संचमध्ये प्रवेश देते. त्यानंतर Airtel Xstream Mobile Pack मध्ये देखील प्रवेश आहे, ज्याद्वारे युजर्स कोणत्याही एका Xstream चॅनेलमध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रवेश करू शकतात. Apollo 24x7 Circle, Shaw Academy, Fastag Cashback, Free HelloTunes आणि Wink Music यासह इतर एअरटेल थँक्स फायदे देखील दिले आहेत.
एअरटेलचा 449 रुपयांचा प्लॅनएअरटेलने ऑफर केलेला हा पहिला 2.5GB रोजचा डेटा प्रीपेड प्लॅन नाही. युजर्स 449 रुपयांमध्ये असाच दुसरा प्लॅन मिळवू शकतात. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे याची व्हॅलिडिटी केवळ 28 दिवसांची आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये Amazon प्राइम सब्सक्रिप्शन दिले जात नाही. मात्र, एअरटेल थँक्स फायदे आहेत, ज्यात Amazon Prime Video Mobile Edition ची एक महिन्याची (30 दिवस) फ्री ट्रायलचा समावेश आहे.