मुंबई, दि. 22 - टेलीकॉम कंपनी भारती एअरटेल पुन्हा एकदा रिलायन्स जिओला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल स्वस्त 4G फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. जिओच्या 1500 रूपयांच्या फोनला टक्कर मिळावी यासाठी एअटरटेलच्या या फोनची किंमत 2 हजार पाचशे रूपये असण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातील किंवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कंपनी हा फोन बाजारात आणू शकते. यासाठी फोन बनवणा-या कंपन्यांसोबत एअरटेलची चर्चा सुरू आहे. जिओप्रमाणे या फोनमध्ये इंटरनेट आणि व्हॉइस कॉल फ्री मिळण्याचीही शक्यता आहे. हा फोन अॅंन्ड्रॉइड सिस्टिमवरच आधारित असेल तसंच यामध्ये गुगल प्ले-स्टोअरवरून अॅप डाउनलोड करण्याचं फिचरही मिळेल. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, फोन बनवणा-या कंपन्यांसोबत एअरटेलची चर्चा सुरू आहे. फोनमध्ये मोठी स्क्रीन, चांगला कॅमेरा आणि उत्तम बॅटरी बॅकअप असेल. 4G स्मार्टफोन्स बनवण्याबाबत दिग्गज टेलिकॉम कंपनीसोबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे असे संकेत फोन निर्माती कंपनी लावा (Lava) किंवा कार्बन (Karbonn) या कंपन्यांनी दिले आहेत. मात्र, दोन्ही कंपनींकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीफ्री इंटरनेट आणि कॉलिंग सर्विसमुळे रिलायन्स जिओने देशभराती टेलीकॉम मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली होती. आता 24 ऑगस्टपासून जिओचा केवळ 4G बुक करता येणार आहे. 24 ऑगस्टपासून जिओ फोन बुक करता येणार आहे. त्यासाठी 1500 रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. पण, तीन वर्षं फोन वापरल्यानंतर ही रक्कम ग्राहक हवी तेव्हा परत घेऊ शकतात. या जिओ फोनवर 153 रुपयांत जिओ अनलिमिटेड धनधनाधन प्लॅन उपलब्ध असेल, तर जिओ ग्राहकांसाठी व्हॉइस कॉलिंग कायमच मोफत राहणार आहे. 50 कोटी मोबाइल यूजर्सपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचा निर्धार कंपनीनं केला आहे. हा फोन पूर्णपणे 'मेड इन इंडिया' असून त्याचं वर्णन रिलायन्सनं 'इंडिया का इंटेलिजन्ट फोन' असं केलं आहे.
जिओ फोनला मिळणार तगडी टक्कर, एअरटेलचा 2,500 रूपयात 4G स्मार्टफोन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 1:56 PM
टेलीकॉम कंपनी भारती एअरटेल पुन्हा एकदा रिलायन्स जिओला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल स्वस्त 4G फोन लॉन्च
ठळक मुद्देजिओच्या 1500 रूपयांच्या फोनला टक्कर मिळावी यासाठी एअटरटेलच्या या फोनची किंमत 2 हजार पाचशे रूपये असण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातील किंवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कंपनी हा फोन बाजारात आणू शकते.जिओप्रमाणे या फोनमध्ये इंटरनेट आणि व्हॉइस कॉल फ्री