प्रत्येकाची स्मार्टफोनची गरज वेगवेगळी असते. काहींना गेमिंगसाठी चांगला प्रोसेसर हवा असतो, तर काहींना फोटग्राफीसाठी कॅमेरा. परंतु काहींना मजबूत बॉडी असलेला स्मार्टफोन हवा असतो, असे लोक Rugged Phone उत्तम पर्याय ठरू शकतात. आज आपण अशाच एका Strong Phone ची माहिती घेणार आहोत. OUKITEL WP17 नावाचा हा फोन 8,300mAh Battery (Big Battery) सह लाँच करण्यात आला आहे.
OUKITEL WP17 चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.78-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. OUKITEL WP17 मध्ये कंपनीने 2.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी95 चिपसेट दिला आहे. त्याला माली जी 76 जीपीयूची जोड देण्यात आली आहे. हा फोन 8GB RAM आणि 128GB Storage ला सपोर्ट करतो.
OUKITEL WP17 जागतिक बाजारात MIL-STD-810G certification सह सादर करण्यात आला आहे. हा एक शॉकप्रूफ फँन आहे, त्यामुळे उंचावरून पडल्यावर देखील या फोनला काही होत नाही. तसेच हा स्मार्टफोन IP68/IP69K वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे. या फोनची अजून खासियत म्हणजे 8,300mAh battery देण्यात आली आहे ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सपोर्ट देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी या डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 20 मेगापिक्सलची नाइट विजन लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. यातील सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. या फोनची किंमत 399.99 डॉलर (सुमारे ₹ 30,000) आहे.