चेन्नईच्या उच्च न्यायालयाने घातलेली बंदी Tik Tok च्या पथ्यावरच पडली आहे. गुगल प्लेस्टोअरवर पुन्हा आल्यानंतरच्या पहिल्याच आठवड्यात Tik Tok ने आयओएसवर मोफत अॅपच्या यादीत पहिला क्रमांक पटकावल्याचा दावा केला आहे. तसेच प्लेस्टोअरवरही हे अॅप सोशल कॅटॅगरीमध्ये वरच्या रांगेत पोहोचले आहे.
यामुळे कंपनीने नवीन कॅम्पेन सुरु केले असून #ReturnOfTikTok या नावाने ट्रेंड होत आहे. एवढेच नाही तर टीक टॉकने युजर्सना 1 लाख रुपये जिंकायची संधी दिली आहे.
1 लाख रुपये जिंकण्यासाठी सोशल मिडीयावर #ReturnofTikTok शेअर करावे लागणार आहे. या मायक्रोसाईटमध्ये युजरला एक लिंक पाठविली जाईल. यानुसार iOS आणि अँड्रॉईडवर अॅप डाऊनलोड करू शकता. 1 ते 16 मे पर्यंत या स्कीममध्ये दररोज तीन जणांना विजेते घोषित केले जाणार आहे. त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले जाणार आहेत.
उच्च न्यायालयाने बंदी मागे घेतल्यानंतर युजर्सनी टीक टॉकला चांगला रिस्पॉन्स दिला आहे. यामुळे कंपनीने हे कॅम्पेन सुरु केल्याचे भारतातील अधिकारी सुमेधास राजगोपाल यांनी सांगितले. भारतामध्ये 20 कोटींपेक्षा जास्त युजरनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांचे आभार मानण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहे.