शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

खुशखबर! भारताला मोठं यश; स्मार्टफोनच्या किंमती कमी होणार; कारण जाणून वाटेल अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 3:59 PM

भारतात अशा प्रकारची चीप तयार होण्याची ही पहिलीच वेळ असेल...!

भारतात गेल्या अनेक वर्षांपासून स्मार्टफोनची निर्मिती होते. एवढेच नाही, तर मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोन एक्सपोर्ट देखील केले जातात. मात्र, भारतात स्मार्टफोन तयार करताना काही अडचणीही येत होत्या. हे फोन तयार करण्यासाठी लागणारे पार्ट्स बाहेरून मागवावे लागत होते. परिणामी फोन तयार करण्यासाठी अधिक खर्च येत होता. मात्र आता भारताला एक मोठे यश मिळाले आहे. जे जाणून आपल्यालाही अभिमान वाटेल. 

तयार होणार मेड इन इंडिया चिपसेट -खरे तर, अमेरिकन कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर बनविण्याचे युनिट टाकत आहे. यासंदर्भात बोलताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आयटी आणि टेलीकॉम मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, मायक्रॉन पुढील 18 महिन्यांत भारतामध्ये चिपचे प्रोडक्शन सुरू करेल. एखाद्या कंपनीने भारतात अशा प्रकारची चीप तयार करण्याची ही पहिलीच वेळ असेल. साधारणपणे डिसेंबर 2024 मध्ये भारतात ही चीप तयार होण्याची शक्यता आहे.

असा होईल फायदा -माध्यमांतील वृत्तांनुसार, ही चीप भारतात तयार झाल्यानंतर, मोबाईल, लॅपटॉप, सर्व्हर आदी काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तयार करण्यासाठी कमी खर्च येईल. यामुळे भारतात स्मार्टफोनची किंमत कमी होईल. याच बरोबर भारतातून जगातील इतर देशांत स्मार्टफोन एक्सपोर्ट करण्यात तेजी येईल. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल. याशिवाय देशात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्याही निर्माण होऊ शकतात. 

युनिटसाठी एवढा खर्च अपेक्षित -केंद्रीय मंत्र्यांच्या मते, या चिप युनिटसाठी 825 मिलियन डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे. हे प्रोडक्शन युनिट 5,00,000 स्क्वेअर  फुटांत पसरलेले असेल. जे 2024 च्या अखेरीस सुरू होईल.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनGovernmentसरकारGujaratगुजरातtechnologyतंत्रज्ञान