शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
2
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
3
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
4
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
5
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
6
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
7
Ganesh Visarjan 2024 Live: गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
8
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
9
दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य...
10
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट
11
टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात
12
IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर 
13
“स्वाभिमानाने लढलो, उद्धव ठाकरेंनी केले ते करायची हिंमत आहे का?”; राऊतांचा शिंदेंना टोला
14
मनू भाकरने 'दुखावलेल्या' नीरज चोप्रासाठी लिहिला खास भावनिक संदेश, ट्विट करत म्हणाली...
15
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
16
Atishi Marlena : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आतिशी घेणार 'हा' मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात येणार पैसे
17
OTTनंतर जुनैद खान झळकणार रुपेरी पडद्यावर, या अभिनेत्रीसोबत करणार रोमांस
18
स्कार्पिओतून येऊ लागला धूर; बोनेट उघडताच बसला धक्का, आतून निघाला महाकाय अजगर
19
NTPC Green Energy लवकरच IPO साठी अर्ज करणार, १०००० कोटी रुपयांची असू शकतो आयपीओ
20
छाया कदम यांनी सांगितली सौंदर्याची खरी व्याख्या; म्हणाल्या, "दीपिका, आलियासारखं..."

काळजी घ्या! गुगल अन् मायक्रोसॉफ्टच्या ३ लाख वापरकर्त्यांना मोठा धोका; बँक खाते रिकामे होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:15 AM

Google आणि Microsoft वापरणाऱ्यांसाठी हॅकरचा धोका आहे. यामुळे तुमचे बँक खाते खाली होऊ शकते.

डिजिटल युगात अनेकजण ऑनलाईनद्वारे व्यवहार करतात. पण सध्या सायबर फसवणुकीसारख्या अनेक घटना समोर आल्या आहेत, काही दिवसापूर्वीच जगभरात माक्रोसॉफ्ट डाऊन झाले होते, त्यामुळे जगभरातील व्यवहार ठप्प झाले होते. आता पुन्हा एकदा इंटरनेट वापरकर्त्यांवर मोठा धोका निर्माण झाला आहे. हा धोका Google Chrome आणि Microsoft Edge चे ब्राउझर वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी आहे. याच्या मदतीने हॅकर्स तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केलेला संवेदनशील डेटा, बँकिंगची माहिती आणि पासवर्ड सहज चोरू शकतात. सायबर सुरक्षा कंपनी ReasonLabs च्या अहवालानुसार, मालवेअर असलेले हे ब्राउझर एक्सटेशन २०२१ च्या वापरकर्त्यांना याचा धोका आहे. आतापर्यंत जगभरातील किमान ३ लाख Google Chrome आणि Microsoft Edge वापरकर्त्यांवर याचा परिणाम झाला आहे.

Jio चा BSNL वर पलटवार; 349 रुपयांचा प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G डेटा अन्...

या मालवेअर एक्सटेंशनला धोकादायक असल्याचे सांगितलं जात आहे. हे एक्सटेंशन छोटे सॉफ्टवेअर प्रोग्राम आहेत, हे ब्राउझिंग अनुभव सुधारण्यासाठी काम करतात. हॅकर्सचे मालवेअर एक्सटेंशन टूल्स सारखीच दिसतात. यामुळे आपल्याला यावर कोणताही संशय येत नाही. ते एकदा सुरू केल्यानंतर एक्सटेंशन हॅकर्सना पासवर्ड, ब्राउझिंग इतिहास आणि बँक तपशीलांसह सिस्टममधील संवेदनशील डेटामध्ये प्रवेश करतात.

आपण आपल्या सिस्टीममधून ते एक्स्टेंशन हटवल्यानंतरही मालवेअर कॉम्प्युटरमध्ये लपून राहतो आणि सिस्टम ऑन होताच सक्रिय होतो. या मालवेअर एक्सटेंशनसह वापरकर्त्यांना अडकवण्यासाठी हॅकर्स Malvertising युक्ती वापरतात.

ही काळजी घ्या

तुमच्या कॉम्प्युटरमध्ये हे मालवेअर आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता. तुमच्या सिस्टीममध्ये हा  मालवेअरने असल्यास तुमची स्क्रीन Google Chrome आणि Edge वरून हॅकरच्या शोध पोर्टलवर रिडायरेक्ट होईल. याशिवाय, तुम्ही सिस्टम फोल्डरमधील फाइल्स तपासून हा मालवेअर देखील शोधू शकता.

या मालवेअरचे एक्सटेंशन काढून टाकण्यासाठी, वापरकर्त्यांना आधी शेड्यूल्ड टास्क काढून टाकावे लागतील. यानंतर, तुम्ही रजिस्ट्री की हटवून या मालवेअरपासून मुक्त होऊ शकता. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानgoogleगुगलmicrosoft windowsमायक्रोसॉफ्ट विंडो