फिटनेस बँडमध्ये डिझाईन हा सर्वात महत्वाचा फॅक्टर असतो. याचा विचार करता हे मॉडेल दिसण्यास अतिशय आकर्षक असेच आहे. याला उच्च दर्जाच्या प्लास्टीकपासून तयार करण्यात आले असून याला लेदरच्या पट्टयाची जोड देण्यात आली आहे. याची गोलाकार डिझाईन लक्ष वेधून घेणारी आहे. हा फिटनेस बँड ग्राहकांना काळा, पांढरा आणि लाल या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे. यामध्ये एफक्यूव्हिजीए म्हणजेच २४० बाय २०४ पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यातील २३० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर चांगला बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
बिंगो एफ २ फिटनेस बँडमध्ये ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. याच्या मदतीने या बँडला अँड्रॉइड, आयओएस व विंडोज प्रणालीवर चालणारा स्मार्टफोन कनेक्ट करता येतो. या स्मार्टफोनचे सर्व नोटिफिकेशन्स बँडवर येण्याची सुविधा आहे. याच्या अंतर्गत कॉल आणि एसएमएस आल्यावर व्हायब्रेशनच्या स्वरूपात संबंधीत युजरला माहिती दिली जाते. तर यात फोन कॉल रिमाइंडरही देण्यात आले आहे. यात फिटनेसशी संबंधीत अनेक महत्वाच्या बाबी देण्यात आल्या आहेत. यात इनबिल्ट हार्ट रेट मॉनिटर असून याच्या मदतीने युजरच्या हृदयाच्या ठोक्यांचे मापन करता येते. याल उत्तम दर्जाची ‘स्लीप मॅनेजमेंट प्रणाली’देखील आहे. याचा उपयोग करून निद्रेचे मापन करता येईल. याशिवाय यात पेडोमीटर दिले असून याच्या मदतीने चाललेल्या अंतराची माहितीदेखील मिळणार आहे. बिंगोचा एफ २ फिटनेस बँड हा शाओमीच्या मी बँड-एचआरएक्स एडिशन आणि मी बँड-२ या फिटनेस बँडला स्पर्धा निर्माण करू शकतो.