शाओमी सब-ब्रँड Black Shark ने काही दिवसांपूर्वी आपल्या दोन नवीन Gaming Phones ची घोषणा केली होती. कंपनी लवकरच Black Shark 4S आणि Black Shark 4S Pro हे दोन फोन्स बाजारात घेऊन येणार आहे. यातील Black Shark 4S Pro च्या स्पेसिफिकेशन्स माहिती चिनी टिपस्टरने दिली आहे. लीकनुसार हा फोन क्वॉलकॉमच्या शक्तिशाली Snapdragon 888 Plus चिपसेटसह ग्राहकांच्या भेटीला येईल.
कंपनीने यावर्षी मार्चमध्ये Black Shark 4 आणि Black Shark 4 Pro हे दोन गेमिंग फोन्स सादर केले होते. आता कंपनी या फोन्सच्या अपग्रेड व्हर्जन Black Shark 4S आणि 4S Pro वर काम करत आहे. यातील प्रो मॉडेल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888+ सह सादर केला जाईल. तसेच या फोनमधील डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. याफोनमधील बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Black Shark 4 आणि 4 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Black Shark 4 आणि 4 Pro मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. Black Shark 4 मध्ये Snapdragon 870 चिपसेट आणि Pro मॉडेलमध्ये Snapdragon 888 देण्यात आला आहे. हे गेमिंग स्मार्टफोन 16GB पर्यंतच्या RAM आणि 512GB पर्यंतच्या स्टोरेजसह बाजारात आले आहेत. अँड्रॉइड 11 सह येणाऱ्या या गेमिंग स्मार्टफोन फिजिकल पॉप-अप गेमिंग ट्रिगर बटन्स देण्यात आले आहेत.
दोन्ही फोन 20-MP च्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. Black Shark 4 स्मार्टफोनमध्ये 48MP + 8MP (अल्ट्रावाईड) + 5MP (मॅक्रो) असा रियर कॅमेरा सेटअप आहे. तर प्रो मॉडेलमध्ये 64MP + 8MP (अल्ट्रावाईड) + 5MP (मॅक्रो) असे कॅमेरा सेन्सर मिळतात. दोन्ही मॉडेलमध्ये 4,500mAh ची बॅटरी, 120W रॅपिड चार्जिंगसह देण्यात आली आहे.