Black Shark हा Xiaomi चा सब-ब्रँड आपल्या गेमिंग-सेंट्रिक स्मार्टफोन्ससाठी ओळखला जातो. कंपनीनं काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये दोन दमदार स्मार्टफोन Black Shark 5 आणि Black Shark 5 Pro लाँच केले होते. तेव्हापासून जागतिक बाजारातील गेमर्स हे फोन्स विकत घेण्यासाठी उत्सुक आहेत. आता कंपनीनं हे शानदार कॅमेरा, दमदार बॅटरी आणि मोठी स्क्रीन असलेले हँडसेट जागतिक बाजारात लाँच केले आहेत.
Black Shark 5 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स
दोन्ही गेमिंग फोनमध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. जो 720Hz टच सॅम्पलिंग रेट, 1300 निट्स ब्राईटनेस, HDR10+ आणि 1.07 बिलियन कलर्सला सपोर्ट करतो. यातील प्रो व्हेरिएंट क्वालकॉमच्या सर्वात वेगवान स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेटवर चालतो. तर वॅनिला व्हेरिएंट Snapdragon 870 चिपसेटसह बाजारात आला आहे. सोबत 16GB पर्यंत LPDDR5 आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. हे स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित जॉययुआय 13 वर चालतात.
फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा मुख्य सेन्सर, 13MP चा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 5MP ची टेलीफोटो लेन्स मिळेल. फ्रंटला 16MP चा सेन्सर आहे. सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4650mAh ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. जी फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज केली जाऊ शकते.
Black Shark 5 आणि 5 Pro ची किंमत
Blackshark 5 स्मार्टफोनचा 8GB/128GB बेस व्हेरिएंट 550 डॉलर (42,778 रुपये) आणि 12GB/256GB मॉडेल 650 डॉलर (50,556 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तर Blackshark 5 Pro च्या 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 800 डॉलर (62,223 रुपये), 12GB/256GB ची किंमत 900 डॉलर (70,001 रुपये) आणि 16GB/256GB ची किंमत 1000 डॉलर (77,788 रुपये) ठेवण्यात आली आहे.