शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
9
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
10
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
11
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
12
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
13
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
14
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
15
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
16
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
17
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
18
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
19
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
20
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला

एकदा चार्ज करा आणि विसरून जा; 8000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आला भन्नाट फोन 

By सिद्धेश जाधव | Published: December 27, 2021 12:33 PM

Blackview नं आपला नवीन स्मार्टफोन 8000mAh पेक्षा जास्त बॅटरीसह सादर केला आहे. हा एक रगेड फोन आहे त्यामुळे कठीण परिस्थितीत देखील स्मार्टफोन बिनदिक्कत वापरता येतो.  

Blackview नं आपला नवीन रगेड स्मार्टफोन Blackview BV8800 लाँच केला आहे. या फोनमध्ये मजबूत बॉडी देण्यात आली आहे. सोबत हाय रिफ्रेश रेट, 50MP कॅमेरा आणि 8380mAh बॅटरी असे स्पेसीफिकेशन्स देण्यात आले आहेत. जास्त वापर केल्यामुळे फोन गरम होऊ नये म्हणून यात लिक्विड कुलिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे.  

Blackview BV8800 चे स्पेसिफिकेशन्स 

Blackview BV8800 फोनमध्ये 6.58 इंचाचा Full HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा एक रगेड फोन आहे, जो MIL-STD-810H सर्टिफिकेशनसह सादर करण्यात आला आहे. म्हणजे हा मिल्ट्री ग्रेड मजबूत बॉडी मिळते. तसेच यात IP68 आणि IP69K डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स सर्टिफिकेशन मिळते.  

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50MP चा Samsung JN1 सेन्सर, 2MP ची डेप्थ लेन्स आणि 20MP चा नाइट विजन कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन MediaTek Helio P25 प्रोसेसरवर चालतो. यात 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. कंपनीने आपल्या या हँडसेटमध्ये 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 8380mAh ची बॅटरी दिली आहे.  

Blackview BV8800 ची किंमत 

Blackview BV8800 फोनची किंमत 300 डॉलर्स (सुमारे 22500 रुपये) ठेवली आहे. ही या फोनच्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. हा फोन AliExpress वरून 1500 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. डिवाइसची विक्री 10 जानेवारीपासून सुरु होईल. 

हे देखील वाचा:  

सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास

सावधान! अँड्रॉईड फोनवर या 8 चुका करत असाल तर, घोटाळेबाजांना तुम्हीच मदत करताय

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड