आपल्या Rugged Smartphone साठी ओळखल्या जाणाऱ्या Blackview नं आपल्या पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीनं जागतिक बाजारात Blackview BL8800 आणि Blackview BL8800 Pro असे दोन जबरदस्त हँडसेट सादर केले आहेत. दोन्ही फोन्समध्ये 8,380mAh ची मोठी बॅटरी मिळते, जी सिंगल चार्जवर पाच दिवसांचा बॅकअप देऊ शकते.
स्पेसिफिकेशन्स
Blackview BV8800 फोनमध्ये 6.58 इंचाचा Full HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा एक रगेड फोन आहे, जो MIL-STD-810H सर्टिफिकेशनसह सादर करण्यात आला आहे. म्हणजे हा मिल्ट्री ग्रेड मजबूत बॉडी मिळते. तसेच यात IP68 आणि IP69K डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स सर्टिफिकेशन मिळते.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50MP चा Samsung JN1 सेन्सर, 2MP ची डेप्थ लेन्स आणि 20MP चा नाइट विजन कॅमेरा देखील देण्यात आला आहे. Blackview BL8800 मध्ये नाईट व्हिजन कॅमेरा आहे तर Blackview BL8800 Pro मध्ये FLIR थर्मल इमेजिंग कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसरवर चालतो. यात 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. कंपनीने आपल्या या हँडसेटमध्ये 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 8380mAh ची बॅटरी दिली आहे. हिट मॅनेज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 3डी कॉपर पाईप लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही हँडसेट ब्लॅक, ऑरेंज आणि ग्रीन कलरमध्ये विकत घेता येतील.
किंमत
हे स्मार्टफोन्स काही दिवसांपूर्वी सादर झाले असून आता विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. या फोन्सच्या किंमतीची सुरुवात 350 डॉलर (सुमारे 27,000 रुपये) पासून होते. हे फोन्स विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म्समधून भारतात आयत करता येतील.