स्वदेशी Noise आपल्या स्मार्टवॉच पोर्टफोलियोमध्ये नव्या डिवाइसची भर टाकली आहे. नव्या Noise Colorfit Pulse Buzz मध्ये कंपनीनं ब्लूटूथ कॉलिंग फिचर दिलं आहे. सिंगल चार्जमध्ये हे वॉच सात दिवस वापरता येतं असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच यात 60 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड, 150 पेक्षा जास्त वॉच फेस देखील देण्यात आले आहेत.
Noise Colorfit Pulse Buzz चे स्पेसिफिकेशन
Noise Colorfit Pulse Buzz मध्ये 1.69 इंचाचा TFT LCD डिस्प्ले 240x280 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. कस्टमायजेशनसाठी क्लाउड वॉच फेसेज देण्यात आले आहेत. हे वॉच NoiseFit Prime अॅपशी कनेक्ट करता येईल. वॉचमध्ये SMS क्विक रिप्लाय, रिमायंडर आणि वेदर अपडेट देखील मिळेल. यात म्यूजिक कंट्रोल आणि फाईंड माय फोनचा पर्याय देखील मिळेल.
या वॉचची सर्वात खास बाब अशी की यात ब्लूटूथ कॉलिंग फिचर मिळतं. कॉलिंगसाठी यात ब्लूटूथ v5.1, मायक्रोफोन, स्पिकर आणि डायल अॅप देखील कॉन्टॅक्ट सेव्ह करण्यासाठी देण्यात आलं आहे. Noise Colorfit Pulse Buzz मध्ये 60 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड मिळतात. तसेच 24 तास हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सीजन ट्रॅकिंगसाठी SpO2 सेन्सर, स्ट्रेस मॉनिटर आणि स्लीप मॉनिटरिंगची सुविधा मिळते. वॉटर रेजिस्टन्ससाठी या वॉचमध्ये IP68 रेटिंग देण्यात आली आहे. यातील 230mAh ची बॅटरी 7 दिवसांचा बॅकअप देते.
Noise Colorfit Pulse Buzz ची किंमत
Noise Colorfit Pulse Buzz ची किंमत 3,499 रुपये ठेवण्यात आली आहे, आजपासूनच याची विक्री कंपनीच्या वेबसाईटसह अॅमेझॉनवरून केली जाईल. तिथे मात्र या स्मार्टवॉचची किंमत 2,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे वॉच शॅम्पेन ग्रे, इलेक्ट्रिक ब्लू, जेट ब्लॅक, ऑलिव्ह ग्रीन आणि रोज पिंक कलरमध्ये विकत घेता येईल.