शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
4
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
5
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
6
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
7
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
8
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
9
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
10
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
11
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
12
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
13
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
14
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
15
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
17
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
18
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
19
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
20
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

एका चार्जमध्ये 30 तास म्युजिक टाइम; boAt चे तगडे Earbuds बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज 

By सिद्धेश जाधव | Published: June 11, 2022 11:59 AM

boAt ने स्टाइलिश डिजाइन आणि जबरदस्त बॅटरी बॅकअपसह स्वस्त boAt Airdopes 191G gaming TWS इयरबड्स लाँच केले आहेत.  

गेमर्ससाठी खास ऑडिओ प्रोडक्ट लाँच करण्याची घोषणा boAt नं काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार कंपनीनं आता Airdopes 191G Gaming TWS इयरबड्स भारतात लाँच केले आहेत. गेमिंगसाठी लो लेटन्सी खूप आवश्यक असते, त्यावर भर देत कंपनीनं 65ms लेटन्सी असलेल्या बीस्ट मोडसह हे बड्स बाजारात आणले आहेत.  

boAt Airdopes 191G gaming TWS ची किंमत 

boAt Airdopes 191G इयरबड्स तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवरून विकत घेऊ शकता, तसेच Amazon आणि Flipkart या दोन प्रमुख ई-कॉमर्स साईट्स देखील यांची विक्री करत आहेत. हे इयरबड्स तुम्ही 1,499 रुपायांमध्ये खरेदी करू शकता. ब्लॅक, ब्लू, ग्रे आणि रेड असे कलर ऑप्शन देखील देण्यात आले आहेत.  

boAt Airdopes 191G Gaming TWS चे स्पेक्स 

कंपनीनं यात स्टेम डिजाइनचा वापर केला आहे, ज्यात इयरबड्सची बॉडी थोडी ट्रान्सपरंट देखील आहे. सोबत कंपनीनं स्टायलिश चार्जिंग केस देखील सादर केला आहे, ज्याचा आकार षट्कोनी आहे. चार्जिंग केसमधील ब्रीदिंग एलईडी लाईट्स लक्ष वेधून घेतात.  

boAt Airdopes 191G मध्ये 10mm ड्रायवरचा वापर करण्यात आला आहे. यातील Bluetooth 5.2 IWP (Instant Wake and Pair) टेक्नॉलॉजीसह येते. यात क्वॉड स्पीकर सेटअप ENx टेक्नॉलॉजीसह देण्यात आला आहे, जो बॅकग्राउंड नॉइज दडपून टाकतो. या इयरबड्समध्ये IPX5 वॉटर रेजिस्टन्सची सुरक्षा आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे.  

बॅटरी लाईफ पाहता, boAt Airdopes 191G मध्ये 40mAh बॅटरी प्रत्येक इयरबडमध्ये मिळते. तसेच चार्जिंग केसची क्षमता 400mAh आहे. चार्जिंग केससह हे बड्स सिंगल चार्जवर 30 तास वापरता येतात असा कंपनीनं दावा केला आहे. यांचा चार्जिंग टाइम 30-45 मिनिटं आहे, केसमध्ये USB Type-C पोर्ट चार्जिंगसाठी मिळतो.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान