शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत येईल, अशी स्थिती...; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
5
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
6
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
7
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
8
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
9
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
10
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
11
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
12
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
13
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
14
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
15
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
16
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
17
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
18
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
19
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
20
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू

फक्त 2,499 रुपयांमध्ये ANC फिचरसह Boult Audio AirBass SoulPods इयरबड्स लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: October 05, 2021 12:29 PM

Cheap Earbuds with ANC: Boult Audio Airbass SoulPods TWS इयरबड्सची किंमत 2,999 रुपये आहे परंतु लाँच ऑफर अंतगर्त हे बड्स 2,499 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.  

भारतीय ऑडिओ ब्रँड Boultने आपले पहिले अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन तंत्रज्ञान असलेले इयरबड्स भारतात सादर केले आहेत. हे ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इयरबड्स Boult Audio AirBass SoulPods नावाने देशात सादर करण्यात आले आहेत. यातील ANC फिचर बंद केल्यावर Ambient Mode च्या मदतीने आजूबाजूचा आवाज देखील ऐकता येईल.  

Boult Audio Airbass SoulPods ची किंमत  

Boult Audio Airbass SoulPods TWS इयरबड्स कंपनीने 2,999 रुपयांमध्ये सादर केले आहेत. लाँच ऑफर अंतर्गत हे बड्स 2,499 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर मात्र हा डिस्काउंट मिळत नाही. हे इयरबड्स Black आणि White कलर ऑप्शनमध्ये 1 वर्षाचा वॉरंटीसह विकत घेता येतील. 

Boult Audio AirBass SoulPods स्पेसिफिकेशन्स 

Boult Audio AirBass SoulPods ची डिजाईन पाहता, हे बड्स कानाच्या आकारासह सादर करण्यात आले आहेत. यात कंपनीने 10mm चे ड्रायव्हर्स दिले आहेत. यात अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फिचर देण्यात आला आहे. तसेच हे बड्स Ambient Mode ला देखील सपोर्ट करतात.  

सुरक्षेसाठी यात IPX7 वॉटर-रेजिस्टन्स देण्यात आला आहे. हे ब्लूटूथ द्वारे अँड्रॉइड, आयओएस, विंडोज इत्यादी सर्व ब्लूटूथ एनेबल्ड डिवाइसशी कनेक्ट करता येतील. यातील टच कंट्रोल्सच्या मदतीने कॉल, म्यूजिक आणि वॉल्यूम देखील कंट्रोल करता येईल. चार्जिंग केससह हे बड्स 24 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. फक्त इयरबड्स सिंगल चार्जवर 6 तास वापरता येतील. चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान