भारतीय ऑडिओ कंपनी Boult ने मंगळवारी ProBass Escape नावाचे वायरलेस नेकबँड हेडफोन्स लाँच केले आहेत. हे हेडफोन्स डस्ट, स्वेट IPX5 वॉटर रेसिस्टंस आणि टॅन्गल फ्री केबलसह सादर करण्यात आले आहेत. ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी असलेले हे हेडफोन्स 10 तासांचा बॅटरी बॅकअप देतात, असे कंपनीने सांगितले आहे.
Boult Audio ProBass Escape चे स्पेसिफिकेशन्स
बोल्ट ऑडिओ ProBass Escape मध्ये हाय फिडिलिटी मॅग्नेटिक ड्रॉयव्हर्स देण्यात आले आहेत, जे ऍडिशनल बेस देतात, असा दावा करण्यात आला आहे. या हेडफोन्ससोबत एयर टिप्सच्या दोन अतिरिक्त जोड्या मिळतील. या हेडफोन्सच्या नेकबँडवर आवाज कमी जास्त करण्यासाठी, ट्रॅक बदलण्यासाठी आणि कॉल उचलणे आणि ठेवण्यासाठी कंट्रोल्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, बॅटरी लेव्हल, पावर आणि कनेक्शन स्टेटससाठी इंडिकेटर्स मिळतात.
या हेडफोन्समधील ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी 10 मीटर पर्यंतची रेंज देते. या नेकबँडची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी 1.2 तासांचा वेळ लागतो. मायक्रो यूएसबीने एकदा चार्ज केल्यावर हे हेडफोन्स 10 तासांचा बॅटरी बॅकअप देतात.
Boult Audio ProBass Escape ची किंमत
बोल्ट ऑडिओ ProBass Escape हेडफोन्सची किंमत 999 रुपये आहे. हे हेडफोन्स फ्लिपकार्टवर ब्लु-ब्लॅक, रेड-ब्लॅक आणि ब्लॅक रंगात उपलब्ध होतील. या डिवाइस सोबत एक वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.