Boult नं आपले नवीन नेकबँड ब्लूटूथ इयरफोन्स भारतात सादर केले आहेत. कंपनीचे Boult ProBass ZCharge इयरफोन्स 40 तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देतात. तसेच फक्त 10 मिनिटांच्या चार्जवर तुम्ही 15 तास गाणी ऐकू शकता. यात फक्त आवाजाने डिवाइस कंट्रोल करण्यासाठी व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
Boult ProBass ZCharge ची किंमत
Boult ProBass ZCharge ची किंमत 1,299 रुपये ठेवण्यात आली आहे. सोबत कंपनी एक वर्षाची वॉरंटी देखील देत आहे. हे इयरफोन्स Amazon वरून विकत घेता येतील. कंपनीनं या ऑडिओ डिवाइसचे ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर व्हेरिएंट सादर केले आहेत.
Boult ProBass ZCharge चे स्पेसिफिकेशन्स
Boult ProBass ZCharge मध्ये 14.2mm च्या ड्रायव्हर्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात Bluetooth v5.2 ची कनेक्टिव्हिटी मिळते. कंपनीनं यात ऐरोस्पेस-ग्रेड एलॉय मायक्रो वूफर्सचा वापर केला आहे. जे बेसिक ऑडियो सिग्नेचर कायम ठेऊन एक्स्ट्रा बेस देतात. तर यातील IPX5 रेटिंग पाणी तसेच घामापासून डिवाइसचा संरक्षण करते.
Boult ProBass ZCharge सिंगल चार्जवर 40 तासांची बॅटरी लाईफ देऊ शकतात, असा दावा कंपनीनं केला आहे. जर तुम्ही घाईत असाल तर तुम्ही फक्त 10 मिनिटांच्या चार्जवर 15 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाइम मिळू शकता. यातील व्हॉइस कंट्रोल फिचरच्या मदतीनं फक्त बोलून म्युजिक, व्हॉल्युम आणि कॉल कंट्रोल करता येतात.
हे देखील वाचा:
सावधान! 7 जानेवारीपासून सिमकार्ड ब्लॉक होणार; आजच हे काम करा...