शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

जिओ, एअरटेलच्या गोटात खळबळ उडाली! BSNL 5G या तारखेला लाँच होतेय; टेलिकॉम मंत्र्यांचीच घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 1:38 PM

5G Launched in India: सरकारी कंपनी जी आजवर ४जी लाँच करू शकली नाही, ती आता 5G मध्ये उतरणार आहे. गावागावात नेटवर्क असलेली बीएसएनएल 5G सेवा देणार आहे.

देशात ५जी सेवा अधिकृतरित्या सुरु झाली आहे. एअरटेलने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5G Network लाँच केल्या केल्याच देशभरातील आठ शहरांमध्ये ५जी सेवा सुरु केली आहे. पूर्ण देशभरात ही सेवा मिळण्यासाठी काही काळ लागणार आहे. गावागावात ५जी ची रेंज येण्यासाठी २०२४ उजाडणार आहे. असे असताना आता एअरटेल, रिलायन्स जिओच्या गोटात खळबळ उडविणारी बातमी येत आहे. 

Airtel 5G Signal: हुर्रे! 5G नेटवर्क मिळू लागले; स्मार्टफोनवर साईनही दिसू लागले; तुम्हीही करा चेक...

सरकारी कंपनी जी आजवर ४जी लाँच करू शकली नाही, ती आता 5G मध्ये उतरणार आहे. गावागावात नेटवर्क असलेली बीएसएनएल 5G सेवा देणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या ग्राहकांना आता फार वेळ वाट पहावी लागणार नाही. BSNL ची 5G सर्व्हिस 15 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे. यावरून टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. याची घोषणा इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये करण्यात आली आहे. 

5G Launched in India: 5G साठी कमीतकमी १५ हजार खर्च करावा लागणार; तरच वापरता येणार...

बीएसएनएल पुढील वर्षी ऑगस्टमध्ये ५जी सेवा लाँच करेल. यामुळे तीन खासगी कंपन्या आणि एक सरकारी कंपनी असे चार कंपन्यांमधील चांगल्या स्पर्धेचे एक स्वस्त नेटवर्क तयार होईल, असे वैष्णव यांनी म्हटले आहे. बीएसएनएल आताकुठे नेटवर्कवर 4G लाँच करत असताना पुढील वर्षी ५जीचे लक्ष्य कसे साध्य करू शकेल, असे विचारले असता, वैष्णव म्हणाले की 4G वरून 5G ला जाणे खूप कठीण नाही. या कालावधीत ते साध्य केले जाऊ शकते. BSNL चे 5G नेटवर्क नॉन-स्टँडअलोन आर्किटेक्चरवर आधारित असेल. यामध्ये ऑपरेटर तुलनेने कमी गुंतवणुकीसह त्यांच्या विद्यमान नेटवर्क पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त वापर करू शकतात, असे ते म्हणाले.

५जी बाबत बोलताना वैष्णव यांनी पुढील सहा महिन्यांत २०० शहरांत ५जी सेवा पोहोचणार असल्याचे आश्वासन दिले. पुढील दोन वर्षांत देशातील ८० ते ९० टक्के भागात ५जी सेवा मिळेल. ५जी सेवा ही परवडणारी देखील असेल, असे ते म्हणाले. 

IMC 2022 मध्ये Airtel चा 5G स्पीड 300Mbps वर जात होता. एअरटेलची 5G सेवा 8 शहरांमध्ये प्रथम दिली जात आहे. सध्या Vi 5G च्या रोलआउटबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  एअरटेलने दिल्ली, वाराणसी, मुंबई, बंगळूरू, सिलिगुडी, हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नईमध्ये आजपासून ५जी सेवा सुरु केली आहे.

टॅग्स :5G५जीBSNLबीएसएनएल