BSNL 5G Testing : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने या संधीचा फायदा उचलला आणि स्वस्त प्लॅन्स लॉन्च केले. यासोबतच कंपनी आपल्या नेटवर्कचा वेगाने विस्तार करत आहे. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. BSNL ने 5G नेटवर्कची चाचणी सुरू केली आहे.
तुम्ही BSNL च्या हाय स्पीड डेटाची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. BSNL ने 5G चाचणी (BSNL 5G Network Testing) सुरू केली आहे. म्हणजेच, लवकरच तुम्हाला BSNL च्या हाय स्पीड 5G नेटवर्कचा वापर करता येणार आहे. BSNL सध्या अनेक कंपन्यांच्या सहकार्याने 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. बीएसएनएलचा हा प्रयोग यशस्वी झाला, तर टेलिकॉम क्षेत्रात त्याचा खरोखरच मोठा परिणाम होईल.
BSNL च्या 4G-5G च्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी कंपनीने Lekha Wireless, Galore Networks, VVDN Technologies आणि WiSig सारख्या कंपन्यांसोबत भागादारी केली आहे. या कंपन्या BSNL साठी 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. एका अहवालानुसार, BSNL सध्या दिल्लीच्या मिंटो रोडवर लेखा वायरलेसच्या सहकार्याने 5G नेटवर्कची चाचणी करत आहे. VVDN ने चाणक्यपुरीमध्ये 5G नेटवर्कची चाचणी सुरू केली आहे. Galore Networks सध्या MTNL साठी शादीपूर, राजेंद्र नगर आणि करोल बाग येथे 5G नेटवर्कची चाचणी करत आहे.