भारतातील Jio, Airtel आणि Vi या प्रमुख टेलीकॉम ऑपरेटर्सनी अपले मोबाइल टेरिफ सरासरी 15 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. यामुळे, अनेक मोबाइल सब्सक्राइबर परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनमुळे BSNL मध्ये स्विच होत आहेत. यातच आता BSNL देखील लवकरच आपली 4जी सर्व्हिस लॉन्च करत आहे.
देशातील अनेक शहरांमध्ये ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या Jio आणि Airtel सोबत BSNL स्पर्धा करत आहे. ते आपले ब्रॉडबँड प्लान्स अधिक परवडणारे करत आहेत. BSNL ने अलीकडेच त्यांच्या परवडणाऱ्या फायबर ब्रॉडबँड प्लॅनसह उपलब्ध स्पीड लिमिट अपग्रेड केली आहे. कंपनीने 249 रुपये, 299 रुपये आणि 329 रुपयांच्या प्लॅनसाठी स्पीड लिमिट वाढवली आहे.
असा आहे BSNL चा फायबर ब्रॉडबँड प्लॅन -BSNL चा सर्वात स्वस्तातला फायबर ब्रॉडबँड प्लॅन 249 रपये प्रति माहपासून सुरू होतो. या प्लॅनमध्ये सब्सक्रायबर्सना 10 Mbps पर्यंतची स्पीड ऑफर केली जात होती. मात्र आता या प्लॅनमध्ये 25 Mbps पर्यंतची स्पीड प्रोव्हाइड केली जाते. याशिवाय, 299 रुपये आणि 329 रुपयांचे असे दोन प्लॅन आहेत, जे आता 25 Mbps स्पीड ऑफर करतील. या पूर्वी हे अनुक्रमे 10 Mbps आणि 20 Mbps पर्यंत होती.
249 रुपयांचा आणि 299 रुपयांचा प्लॅन केवळ नव्या युजर्ससाठीच उपलब्ध आहेत. तर. 329 रुपयांचा प्लॅन काही निवडक सर्कल्समध्ये उपलब्ध आहेत. जर आपण कॉस्ट-इफेक्टिव्ह रिचार्ज प्लॅन्ससाठी BSNL मध्ये स्विच होणार असाल तर BSNL चे नेटवर्क आपल्या शहरात अॅक्सेसिबल आहे की नाही हे व्हेरिफाय करणे अत्यंत आवश्यक आहे.