नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी दररोज सर्वात स्वस्त आणि किफायतशीर प्लॅन आणत आहे. अलीकडेच बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे.
विशेष बाब म्हणजे, या प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडिटी फक्त 75 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच, लोकल आणि इंटरनॅशनलसाठी 200 मिनिटे व्हॉइस कॉलिंग मिळत आहे. दुसरीकडे, बीएसएनएल आपल्या दुसऱ्या प्लॅन अंतर्गत 75 जीबी डेटा देखील देत आहे. या प्लॅनची खासियत जाणून घ्या...
75 रुपयांचा प्लॅनबीएसएनएलच्या या प्लॅनची खासियत म्हणजे यामध्ये डेटा, कॉलिंग आणि इतर बेनिफिट्स दिले जात आहेत. प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे. यासोबत व्हॉईस कॉलिंगसाठी 200 मिनिटे आणि 2 जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, मोफत कॉलरट्यून्सचाही लाभ मिळत आहे.
75 जीबी डेटा असलेला प्लॅनबीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दरमहा 75 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे 300 दिवसांची व्हॅलिडिटी आहे.
जाणून घ्या बेनिफिट्स...बीएसएनएलच्या या प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळत आहे. तसेच, ग्राहकांना दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात. त्याचबरोबर, युजर्सना दर महिन्याला 75 GB डेटा मिळतो. जर डेटा आधीच संपला असेल, तर इंटरनेटचा वेग 40 Kbps होतो. विशेष बाब म्हणजे यामध्ये 60 दिवसांसाठी 75 जीबी डेटा मिळणार आहे. यानंतर युजर्सना अन्य प्लॅनने रिचार्ज करावे लागेल.