शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
3
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
4
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
5
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
6
900% पर्यंत खटा-खट परताना देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
7
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
8
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
9
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
10
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
11
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
12
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
13
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
14
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
15
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
16
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
17
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
18
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
19
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
20
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला

BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 3:17 PM

BSNL : कंपनी ग्राहकांसाठी सतत नवीन योजना आणत आहे. बीएसएनएल अजूनही ग्राहकांना जुन्या किमतीत स्वस्त रिचार्ज प्लॅन देत आहे. 

नवी दिल्ली : एअरटेल (Airtel), जिओ (Jio) आणि व्होडाफोन-आयडिया (VI) द्वारे रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केल्यानंतर अनेक ग्राहकांनी बीएसएनएलकडे (BSNL) आपला मोर्चा वळविला आहे. रिचार्ज प्लॅन महाग झाल्यानंतर अनेकांनी बीएसएनएलमध्ये आपले मोबाईल नंबर पोर्ट केले आहेत. दरम्यान, कंपनी ग्राहकांसाठी सतत नवीन योजना आणत आहे. बीएसएनएल अजूनही ग्राहकांना जुन्या किमतीत स्वस्त रिचार्ज प्लॅन देत आहे. 

बीएसएनएल सतत ४ जी नेटवर्कवर काम करत आहे. स्वस्त रिचार्ज प्लॅन आणि ४ जी नेटवर्कनंतर आता बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सेवा सुरु केली आहे. सततच्या स्पॅम कॉल्सच्या समस्येमुळे ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेत कंपनीने ही नवीन सेवा सुरु केली आहे. ग्राहक कंपनीच्या सेल्फकेअर ॲपवर स्पॅम कॉल्स आणि स्पॅम मॅसेजबद्दल तक्रार नोंदवू शकतात. 

सेल्फकेअर ॲपस्पॅम कॉल्स टाळण्यासाठी बीएसएनएलने एक उत्तम मार्ग अवलंबला आहे. आता तुम्ही तुमच्या बीएसएनएल नंबरवर येणाऱ्या स्पॅम कॉल्स आणि मेसेजबद्दल लगेच तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीचा सेल्फकेअर ॲप मदत करणार आहे. बीएसएनएल ग्राहक सेल्फकेअर ॲपच्या मदतीने स्पॅम कॉल्स आणि मेसेजबद्दल तक्रार नोंदवू शकतात. 

१८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉकदरम्यान, सध्या स्पॅम कॉल आणि मेसेजची समस्या प्रचंड वाढली आहे. याबाबत दूरसंचार विभागाने देखील अनेकदा कठोर पावले उचलली आहेत. फेक कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्यासाठी ट्रायने (TRAI) १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू केले आहेत. आता ग्राहकांना येणारे फेक कॉल्स आणि मेसेज ऑपरेटर स्तरावरच ब्लॉक केले जातील. ट्रायने घोटाळेबाजांना जोरदार झटका दिला असून गेल्या काही दिवसांत १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स आणि ६८० एंटिटीज (संस्थांना) ब्लॉक केल्या आहेत. 

सेल्फकेअर ॲप अशा प्रकारे वापरू शकता..- सर्वप्रथम तुमच्या फोनवर BSNL सेल्फकेअर ॲप ओपन करा.- आता तुम्हाला स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉटच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल.- यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल आणि Complaint and Preference पर्याय निवडावा लागेल.- नंतर उजवीकडे तीन-लाइन मेनू टॅप करा आणि रिपोर्ट करा.- आता तुम्हाला New Complaint वर क्लिक करावे लागेल.- यानंतर तुम्हाला एसएमएस किंवा व्हॉईस कॉलमधील पर्याय निवडावा लागेल. आणि नंतर संपूर्ण माहिती द्यावी लागेल.- शेवटी, माहिती भरल्यानंतर, तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

टॅग्स :BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल