शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
4
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
5
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
6
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
7
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
8
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
9
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
10
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
11
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
12
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
13
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
14
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
15
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
16
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
17
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
18
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
19
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
20
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!

'या' राज्यातील BSNL चे ग्राहक मोफत पाहू शकतील लाइव्ह टीव्ही आणि OTT प्लॅटफॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:03 IST

BSNL New Service : आता कंपनी आपल्या ग्राहकांना नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम सारखे ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म आणि टीव्ही चॅनेल मोफत पाहण्याचा लाभ देणार आहे. 

BSNL New Service : नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन ऑफर आणत आहे. आता कंपनी आपल्या ग्राहकांना नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम सारखे ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म आणि टीव्ही चॅनेल मोफत पाहण्याचा लाभ देणार आहे. 

कंपनीचे फायबर आधारित ब्रॉडबँड कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना हा लाभ मिळणार आहे. या अंतर्गत ग्राहकांना कोणत्याही खर्चाशिवाय कनेक्शनसह इंट्रानेट टीव्ही सेवा दिली जाईल. ही सेवा बिहारमध्ये लवकरच सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएसएनएलचे फायबर टू द होम (FTTH) नेटवर्क वापरणारे ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतील. 

ग्राहकांना मोफत इंट्रानेट फायबर लाईव्ह टीव्ही सुविधा मिळणार आहे. यामध्ये कंपनी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि टीव्ही चॅनेल पाहण्याची सुविधा देते. ही सेवा सर्वात आधी गया, मुझफ्फरपूर, भागलपूर, पाटणा आणि दरभंगा येथे सुरू होईल. टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही सुरू करण्यात येणार आहे.

बीएसएनएलच्या या सेवेमध्ये ग्राहक कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता ओटीटी आणि टीव्ही चॅनेल पाहू शकतील. यामध्ये नेटफ्लिक्स आणि डिस्ने हॉटस्टार इत्यादींचाही समावेश असणार आहे. याशिवाय त्यांना या प्लॅनमध्ये गेमिंग चॅनेलही मिळतील. ही सुविधा फक्त स्मार्ट टीव्हीवरच मिळू शकते. यामध्ये यूजरला डेटाची काळजी करण्याची गरज नाही.

'या' राज्यांमध्येही ही ऑफर सुरूबीएसएनएलची ही ऑफर आधीच मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि पंजाब सारख्या राज्यांच्या अनेक शहरांमध्ये सुरू आहे. या ऑफरची सर्वात खास गोष्ट म्हणजे याचे फायदे प्रत्येक FTTH प्लॅनवर उपलब्ध आहेत. बीएसएनएल सध्या या सेवेची चाचणी घेत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, यामध्ये ग्राहकांना कोणताही विलंब किंवा बफरिंग न करता लाईव्ह स्ट्रीमिंग मिळत आहे. हे पूर्णपणे बीएसएनएल नेटवर्कवर चालते.

टॅग्स :BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञानBiharबिहार