शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
2
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
3
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
4
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
5
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
7
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
8
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
9
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
10
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
11
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
12
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
13
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
14
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
15
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
16
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
18
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
19
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत

BSNL ग्राहकांना देणार युनिव्हर्सल सिम कार्ड; देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणार 4G- 5G नेटवर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 18:42 IST

मार्च 2025 पर्यंत देशभरात BSNL ची 4G सेवा सुरू होणार आहे. यासाठी 15 हजार टॉवर्स बसवण्यात आले असून, ऑक्टोबरपर्यंत आणखी 80 हजार टॉवर्स बसवण्यात येणार आहेत.

BSNL News : खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel, Vi ने आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्या ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. याचा फायदा घेण्यासाठी BSNL ने अनेक स्वस्त प्लॅन्स लॉन्च केले आहेत. याशिवाय, देशभरात 4g-5g नेटवर्क देण्यासाठी झपाट्याने टॉवर्सची उभारली केली जात आहे. विशेष म्हणजे, BSNL ने ओव्हर द एअर (OTA) ची घोषणा केली आहे, ज्याद्वारे नवीन ग्राहकांना युनिव्हर्सल सिम (USIM) मिळेल.

या युनिव्हर्सल सिम कार्डच्या मदतीने BSNL च्या ग्राहकांना 4G आणि 5G नेटवर्कचा लाभ मिळेल. म्हणजे, भारतातील ज्या ठिकाणी BSNL चे 5G नेवर्क उपलब्ध असेल, तिथे 5G आणि जिथे 4G उपलब्ध असेल, तिथे 4G नेटवर्क मिळेल. यासाठी त्यांना नवीन सिम कार्ड घेण्याची गरज नाही. फक्त त्यांना आपल्या मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जाऊन थोडे बदल करावे लागतील.

BSNL 4G, 5G रेडी OTAबीएसएनएलने X वर याबाबत ही माहिती दिली आहे. याची सुरुवात चंदीगडपासून झाली असून लवकरच देशभरात लॉन्च होणार आहे. त्याचा फायदा असा होईल की, ग्राहकांना वेगवान इंटरनेट आणि चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. OTA प्लॅटफॉर्म 4G आणि 5G दोन्ही नेटवर्कला सपोर्ट करेल. BSNL ची 4G सेवा मार्च 2025 पर्यंत देशभरात सुरू होणार आहे. यासाठी 15 हजार टॉवर्स बसवण्यात आले असून, ऑक्टोबरअखेर 80 हजार अतिरिक्त टॉवर्स बसवण्यात येणार आहेत. तसेच, पुढील वर्षीच 5G सेवाही सुरू केली जाणार आहे.

BSNL मध्ये सिम पोर्ट कसे करावे?आता तुम्ही BSNL मध्ये सिम कार्ड पोर्ट करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून 1900 वर एसएमएस पाठून मोबाइल नंबर पोर्ट करण्याची विनंती करावी लागेल. यासाठी मेसेज बॉक्समध्ये 'PORT' टाइप करा आणि एका स्पेसनंतर तुमचा 10 अंकी मोबाइल नंबर टाका. यानंतर तुमचा मोबाइल नंबर पोर्ट करण्यासाठी तुम्हाला बीएसएनएल सेवा केंद्रावर जावे लागेल.

BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स...

  • BSNL ने एक उत्तम 4G प्लॅन लॉन्च केला आहे. 395 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमेटेड कॉलिंग, 100 SMS आणि दररोज 2 GB डेटा मिळतो. हा प्लॅन फक्त 2399 रुपयांचा आहे. तर, रिलायन्स जिओचा 365 दिवसांचा प्लॅन 3599 रुपयांमध्ये आणि एअरटेलचा 365 दिवसांचा प्लॅन ​3999 रुपयांचा आहे.
  • BSNL द्वारे ऑफर केलेला सर्वात स्वस्त प्लॅन 107 रुपयांचा आहे, ज्यात 35 दिवसांच्या वैधतेसह 3GB 4G डेटा आणि 200 मिनिटे व्हॉइस कॉलिंग मिळते. याशिवाय, BSNL च्या 108 रुपयांच्या विशेष प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 1GB डेटा मिळतो.
  • BSNL च्या 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये दीर्घ वैधता मिळते. 200 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 70 दिवसांच्या वैधतेसह पहिल्या 18 दिवसांसाठी 2GB 4G डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS दररोज मिळतात. तर, 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 70 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 2GB डेटा मिळतो.
  • BSNL च्या 485 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 82 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. 
टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन