नवी दिल्ली - BSNL ने नुकतीच एक ऑफर सुरू केली आहे. यात युजर्सना 30 दिवसांसाठी म्हणजेच संपूर्ण महिनाभरासाठी मोफत डेटा दिला जाणार आहे. या ऑफरच्या माध्यमाने Jio, Airtel आणि Vi च्या युजर्सना आपल्याकडे आकर्षित करण्याचा BSNL चा प्रयत्न आहे. तर जाणून घेऊयात या खास ऑफरबद्दल.
BSNL 30 दिवसांसाठी देत आहे फ्री इंटरनेट - सरकारी दूरसंचार कंपनी BSNL काही खास युजर्सना 30 दिवसांसाठी म्हणजे संपूर्ण महिनाभर 5GB मोफत हाय-स्पीड इंटरनेट देत आहे. मात्र, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल आणि काही अटीदेखील पूर्ण कराव्या लागतील आणि त्यानंतरच तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकाल.
या खास युजर्सना मिळणार फ्री डेटा - जर तुम्हाला BSNL कडून 30 दिवसांसाठी 5GB मोफत इंटरनेट डेटा हवा असेल, तर त्यासाठी तुम्हाला BSNL व्यतिरिक्त इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीचे युजर असणे आवश्यक आहे. खरे तर, BSNL ने एक नवी मोहीम सुरू केली आहे, या मोहिमेचे नाव आहे #SwitchToBSNL. या मोहिमेअंतर्गत, तुम्ही इतर दुसऱ्या कंपनीवरून BSNL वर स्विच केल्यास, तुम्हाला 5GB मोफत इंटरनेट मिळू शकेल.
बीएसएनएलच्या या नव्या कॅम्पेनचे नियम - आपल्याला BSNL च्या या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बीएसएनएलचे आधिकृत फेसबुक पेज (@bsnlcorporate) आणि ट्विटर हॅन्डलला (@bsnlcorporate) फॉलो करावे लागेल. यानंतर, या कॅम्पेनशी संबंधित पोस्ट् आपल्या टाइमलाइनवर शेअर करावी लागेल. शेअर करताना #SwitchToBSNL लिहायला विसरू नका. याच बरोबर, तुम्ही BSNL वर का स्विच होत आहात हेही लिहा आणि कंपनीलाही नक्की टॅग करा.
शेअर केल्यानंतर, त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो कंपनीला त्यांचा व्हॉट्सअॅप नंबर 9457086024 वर पाठवा. जर तुम्ही वरील सर्व स्टेप्स फॉलो केल्या असतील तर तुम्हाला 5GB बोनस डेटा मिळेल. महत्वाचे म्हणजे कंपनी कोणत्या युजर्सना बोनस डेटा देईल आणि कुणाला नाही हे कंपनीवर अवलंबून असेल.
जर तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर बीएसएनएलच्या या ऑफरची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 अशी आहे.