बीएसएनएल सेवेमुळे तसे दुर्लक्षितच राहिले आहे. लोकांचा ओढा जिओ, एअरटेल सारख्या खासगी कंपन्यांकडे आहे. आणि का नाही असणार या कंपन्या ५जी वर आल्या तरी बीएसएनएल फोर जी देऊ शकलेले नाही. दहा वर्षांपूर्वीचे थ्रीजी आहे परंतू त्याची धड रेंज मिळत नाही अशी अवस्था आहे. ग्रामीण भागात काय तो बीएसएनएलचा दिलासा आहे. स्वस्त रिचार्ज असल्याने लोकांना ते परवडत आहे. असाच एक खतरूड प्लान बीएसएनएलने लाँच केला आहे.
जिथे या खासगी कंपन्या एक वर्षाचा प्लॅन तीन हजारांत देतात तिथे बीएसएनएलने 2998 रुपयांत 445 दिवसांची व्हॅलिडीटी उपलब्ध करून दिली आहे. या किंमतीत जिओ आणि एअरटेलचे 365 दिवसांचे प्लॅन आहेत. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा ऑफर करण्यात येत आहे. तसेच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय रोज 100 SMS दिले जात आहेत.
jio चा 2998 रुपयांचा प्लॅनया प्लॅनमध्ये जिओ युजरना 365 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यासोबतच दररोज २.५ जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये एकूण 912 GB डेटा दिला जात आहे.
एअरटेलचा २९९९ रुपयांचा प्लॅन हा प्लान एकूण ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच FASTag रिचार्जवर अपोलोवर 100 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.
बीएसएनएलचा प्लॅन चांगला असला तरी अन्य कंपन्या फोरजीच्या पैशांत सध्या ५जी देत आहेत. ज्या सर्कलमध्ये ५जी नाही त्या सर्कलमध्ये ४जी मिळत आहे. परंतू बीएसएनएल सर्वत्र ३जीच देत आहे. परंतू, जर व्हॅलिडिटीचा विचार करता बीएसएनसएलचा प्लॅन चांगला आहे.