नवी दिल्ली : बीएसएनएल (BSNL) ही देशातील एक प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. BSNL ही आपल्या युजर्ससाठी विविध किंमतींच्या श्रेणीत अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. खाजगी कंपन्या Jio, Airtel आणि Vi यांनी आपल्या चार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर BSNL चे चांगले दिवस पुन्हा एकदा परतले आहेत.
BSNL कडे आपल्या कोट्यवधी युजर्ससाठी अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन आहेत. कंपनी युजर्सना स्वस्त आणि महागडे दोन्ही प्रकारचे प्लॅन ऑफर करते. तसेच, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक जास्त व्हॅलिडिटी असलेले प्लॅन उपलब्ध आहेत. दरम्यान, BSNL चे असे तीन प्लॅन आहेत. ज्यात जास्त व्हॅलिडिटी मिळते. त्यामुळे BSNL ने अनेक खाजगी कंपन्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. या तीन प्लॅनबद्दल जाणून घ्या....
BSNL चा १५० दिवसांचा प्लॅनBSNL आपल्या एका रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना १५० दिवसांची व्हॅलिडिटी देत आहे. या रिचार्ज प्लॅनमुळे तुम्हाला ५ महिने रिचार्ज करण्याची गरज नाही. BSNL च्या या प्लॅनची किंमत ३९७ रुपये आहे. या प्लॅनमध्ये पहिल्या ३० दिवसांसाठी फ्री कॉलिंग आणि दररोज २ जीबी डेटा मिळतो. यासोबतच, युजर्सना ३० दिवसांसाठी दररोज १०० फ्री एसएमएस देखील मिळतील.
BSNL चा १६० दिवसांचा प्लॅनBSNL चा असा एक रिचार्ज प्लॅन आहे. ज्यामध्ये युजर्सना १६० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यासाठी युजर्सना ९९७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागेल. या प्लॅनद्वारे तुम्ही १६० दिवसांसाठी सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग करू शकता. यासोबतच, कंपनी या प्लॅनमध्ये युजर्स दररोज २ जीबी डेटा देखील देत आहे. जर तुम्हाला मोफत कॉलिंग आणि डेटा असलेला प्लॅन हवा असेल तर तुम्ही हा प्लॅन खरेदी करू शकता.
BSNL चा १८० दिवसांचा प्लॅनBSNLच्या पोर्टफोलिओमध्ये १८० दिवसांची व्हॅलिडिटी असलेला प्लॅन देखील मिळत आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत ८९७ रुपये आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला १८० दिवसांसाठी सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळते. याशिवाय, या प्लॅनमध्ये एकूण ९० जीबी डेटा दिला जातो. तसेच, या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि डेटा सोबतच दररोज १०० फ्री एसएमएस देखील मिळतील.