शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

BSNL SIM: घरबसल्या ऑर्डर करा BSNL चे 4G सिम कार्ड; जाणून घ्या प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 16:37 IST

BSNL SIM : हायस्पीड कनेक्टिव्हिटीसाठी ऑक्टोबर 2024 पर्यंत BSNL देशभरात सुमारे 80 हजार टॉवर बसवणार आहे.

BSNL SIM : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी(Jio, Airtel, Vi) आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ला 'अच्छे दिन' आले आहेत. अनेकजण आपले सिम BSNL मध्ये पोर्ट करत आहेत. दरम्यान, आणखी ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी BSNL ने देशात आपली 4G सेवा सुरू केली असून, लवकरच 5G सेवाही सुरू होणार आहे. तुम्हालाही BSNL चे सिम हवे असल्यास, तुम्ही ते घरबसल्या मागवू शकता. 

लवकरच 80 हजार टॉवर बांधणरकेंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2024 पर्यंत BSNL देशभरात सुमारे 80 हजार टॉवर बसवणार आहे. उर्वरित 21 हजार टॉवर मार्च 2025 पर्यंत बसवले जातील. याचा अर्थ मार्च 2025 पर्यंत देशभरात सुमारे 1 लाख बीएसएनएल टॉवर बसवले जातील. याशिवाय 5G सेवेवरही काम सुरू आहे. 5G सेवा फक्त 4G टॉवरवरच मिळू शकते, त्यासाठी काही बदल करावे लागतील, त्यावर काम सुरू असल्याचेही सिंधियांनी सांगितले.

घरबसल्या BSNL सिम ऑर्डर करादेशातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल देशात वेगाने आपले नेटवर्क विस्तारत आहे. Airtel, Jio आणि Vi च्या महागड्या रिचार्जनंतर BSNL सिम घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरबसल्या बीएसएनएल सिमकार्ड मागवू शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

BSNL सिम कार्ड घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. इतर दूरसंचार कंपन्यांप्रमाणे बीएसएनएलनेही प्रून नावाच्या कंपनीसोबत भागीदारी करून सिम कार्ड वितरणाचे काम सुरू केले आहे. या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही सिम कार्ड ऑर्डर करू शकता. हे ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ते 90 मिनिटांत सिम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतील. 

सर्वप्रथम तुम्हाला prune.co.in या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला येथे Buy SIM Card या पर्यायावर क्लिक करावे लागेल. भारत देश निवडून ऑपरेटरसाठी बीएसएनएल निवडावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल, ज्यावर एक OTP येईल. OTP भरण्यासोबतच तुम्हाला येथे विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.

यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता भरावा लागेल. नवीन BSNL सिम कार्ड तुम्हाला पुढील 90 मिनिटांत वितरित केले जाईल. यानंतर तुमचे केवायसी घरबसल्या केले जाईल आणि सिमही अॅक्टिव्ह होईल. सध्या कंपनी फक्त हरियाणातील गुरुग्राम आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात ही सुविधा देत आहे. काही काळानंतर या सेवा इतर शहरांमध्येही सुरू करता येतील.

टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)technologyतंत्रज्ञान