BSNL vs Jio Plan : देशातील खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे अनेक ग्राहक BSNL कडे वळत आहेत. BSNL नेदेखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्वस्त प्लॅन्स आणले आहेत. पण, BSNL ला टक्कर देण्यासाठी Jio ने स्वस्त आणला आहे. आम्ही तुम्हाला दोन्ही कंपन्यांच्या एक ब्रॉडबँड प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला हायस्पीड इंटरनेट मिळते. विशेष म्हणजे, या दोन्ही प्लॅनची किंमत समान आहे.
BSNL 399 ब्रॉडबँड प्लॅन-BSNL च्या या प्लॅनमध्ये 30 Mbps च्या स्पीडने 1TB किंवा 1000GB डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतरही 4 Mbps च्या स्पीडने इंटरनेट चालेल. महत्वाची बाब म्हणजे, हा प्लॅन सर्वत्र उपलब्ध नाही. हा प्लॅन बहुतांशी ग्रामीण भागातच वापरला जातो. व्यावसायिक इमारती किंवा व्यावसायिक ग्राहकांसाठी हा प्लॅन उपलब्ध नाही. पण, तुमच्या घरात खासगी वापरासाठी नक्कीच वापरता येतो.
Jio 399 ब्रॉडबँड प्लॅन-या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 Mbps स्पीडने 3.3 TB डेटा मिळतो. म्हणजेच, तुम्हाला BSNL च्या प्लॅनपेक्षा तीनपट जास्त डेटा मिळतोय. मात्र, यामध्ये कोणताही अतिरिक्त लाभ दिला जात नाही. म्हणजेच, डेटा संपल्यानंतर तुम्हाला परत रिचार्ज करावा लागेल. या दोन्ही प्लॅन्सच्या किमती सेम आहेत, पण डेटा आणि नेटवर्कच्या बाबतीत Jio चा प्लॅन चांगला आहे.