नवी दिल्ली : बीएसएनएल (BSNL) ही देशातील एक प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. बीएसएनएल ही आपल्या युजर्ससाठी विविध किंमतींच्या श्रेणीत अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. खाजगी कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर बीएसएनएलचे चांगले दिवस पुन्हा एकदा परतले आहेत. बीएसएनएलने अनेक स्वस्त प्लॅन आणून खाजगी कंपन्यांच्या अडचणी वाढवल्या आहे.
बीएसएनएलने एक असा प्लॅन आणला आहे, ज्यामुळे युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या खाजगी कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. बीएसएनएलच्या लिस्टमध्ये व्हॅलिडिटीसह अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. बीएसएनएल इतके व्हॅलिडिटी ऑप्शन इतर कोणत्याही खाजगी कंपनीकडे नाहीत.
दरम्यान, बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये ३९७ रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमुळे अनेक युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये व्हॅलिडिटीसह फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सारख्या सर्व आवश्यक सुविधा मिळतात. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये १५० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
बीएसएनएलच्या या ३९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना पहिल्या ३० दिवसांसाठी सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग सर्व्हिस मिळते. याचा अर्थ असा की प्लॅन खरेदी केल्यानंतर, तुम्ही फक्त 30 दिवसांसाठी फ्री कॉल करू शकता. यानंतर, आउटगोइंग कॉल बंद होतील, परंतु इनकमिंग कॉलची सुविधा तुमच्या नंबरवर १५० दिवसांसाठी अॅक्टिव्ह राहील. तसेच, तुम्हाला पहिल्या ३० दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळतो. अशा प्रकारे तुम्ही एकूण ६० जीबी डेटा वापरू शकता.