BSNL Reacharge : खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi ने त्यांच्या रिजार्जच्या किमती वाढवल्यामुळे लाखो ग्राहक BSNL मध्यो सिम पोर्ट करत आहेत. BSNL ने या संधीचा फायदा उचलण्यासाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन्स लॉन्च केले आहेत. आम्ही तुम्हाला अशाच एका स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला कमी किमतीत 395 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीकडे असा प्लॅन नाही, ज्याची 1 वर्षांपेक्षा जास्त व्हॅलिडिटी मिळते.
BSNL चा 2399 रुपयांचा प्लॅनBSNL चा हा रिचार्ज प्लॅन 2,399 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकाला 395 दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये देशभरातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 100 एसएमएस आणि दररोज 2GB हायस्पीड डेटाचा लाभ मिळतो. विशेष म्हणजे, डेटा संपल्यानंतर तुम्ही 40kbps च्या वेगाने अमर्यादित इंटरनेट वापरू शकता.
BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री नॅशनल रोमिंगचाही लाभ मिळतो. यामध्ये 30 दिवसांसाठी मोफत BSNL Tunes चाही लाभ मिळतो. इतकंच नाही, तर हार्डी गेम्स, चॅलेंजर एरिना गेम्स, गेमऑन, ॲस्ट्रोटेल, गेमियम, झिंग म्युझिक, डब्ल्यूडब्ल्यूए एंटरटेनमेंट, लिस्टन पॉडोकॅट यांसारख्या सेवा मिळतात.
4G सेवा लवकरच सुरू होणार आहेBSNL लवकरच देशभरात 4G सेवा सुरू करणार आहे. ऑक्टोबरमध्ये संपूर्ण देशात कंपनीची 4G सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सध्या कंपनी देशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये आणि टेलिकॉम सर्कलमध्ये 4G सेवेची चाचणी घेत आहे. एवढेच नाही, तर कंपनीने देशभरात 25 हजारांहून अधिक 4G मोबाइल टॉवर्स उभारले आहेत.