BSNL : देशातील खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर हजारो यूजर्स BSNL कडे आकर्षित होत आहेत. BSNL देखील आपल्या ग्राहकांसाठी दररोज नवीन योजना आणत आहे. BSNL (BSNL 4G) ने देशात वेगाने आपले नेटवर्क वाढवण्याचे काम सुरू केले आहे. 4G सेवा देखील मार्च 2025 पर्यंत देशभरात सुरू होईल. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला BSNLच्या नवीन प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2GB इंटरनेट डेटा आणि अमर्यादित कॉलिंग मिळेल. विशेष म्हणजे, याची व्हॅलिडिटी 5 महिन्यांपर्यंत आहे.
किंमत 400 रुपयांपेक्षा कमी BSNL च्या या प्लानची किंमत 397 रुपये आहे. हा प्लॅन अशा लोकांसाठी खूप चांगला मानला जातो, जे त्यांच्या स्मार्टफोनमध्ये BSNL सिम दुय्यम सिम म्हणून ठेवतात. या स्वस्त प्लॅनची वैधता 5 महिन्यांची आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला 150 दिवस कोणतेही रिचार्ज करण्याची गरज नाही.
हे फायदे मिळतातBSNL च्या या 397 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना अनेक फायदे मिळतात. या प्लानमध्ये यूजर्सना 30 दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. याचा अर्थ तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कॉल करू शकता. कंपनी युजरला 150 दिवसांसाठी विनामूल्य इनकमिंग कॉलची सुविधा प्रदान करते. म्हणजेच हा प्लॅन खरेदी केल्यानंतर तुम्ही नंबर बंद होण्याच्या तणावातून मुक्त व्हाल.
पहिले 30 दिवस तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि दररोज 2 GB इंटरनेट डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला 40Kbps चा स्पीड मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला पहिल्या 30 दिवसांसाठी दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतात. सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी बीएसएनएलचा हा प्लॅन कामाचा आहे.