जर तुमचा इंटरनेटचा वापर जास्त असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. बीएसएनएलच्या एका प्लॅनमध्ये तुम्हाला एक चांगला इंटरनेट पॅक मिळू शकेल. बीएसएनएलच्या फायबर बेसिक प्लस प्लॅनमध्ये तुम्हाला देशात अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएस, ओटीटी सबस्क्रिप्शन आणि १००० जीबी पेक्षा जास्त डेटा मिळतो.
दरम्यान, बीएसएनएलच्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घ्या, ज्यात तुम्हाला अनलिमिटेड बेनिफिट्स मिळत आहेत. सध्या ग्राहकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल या टेलिकॉम कंपन्या शर्यतीत आहेत. या स्पर्धेमुळे कंपन्या आपल्या ग्राहकांना रिचार्ज प्लॅन देत आहेत.
८ ओटीटी प्लॅटफॉर्मडेटा आणि कॉलिंगसह येणाऱ्या या बीएसएनएल प्लॅनमध्ये तुम्हाला ८ ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळते. यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार प्रीमियम, सोनीलिव्ह आणि वूट यांचा समावेश आहे. ९९९ रुपयांमध्ये तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन मिळत आहे
३९९ रुपयांचा प्लॅनतुम्ही बीएसएनएलचा ३९९ रुपयांचा प्लॅन देखील घेऊ शकता. हा प्लॅन एक महिन्याच्या व्हॅलिडिटीसह मिळत आहे. या प्लॅनमध्ये ३० एमबीपीएसच्या वेगाने १००० जीबी डेटा मिळतो. डेटासोबतच, तुम्ही फिक्स्ड कनेक्शनद्वारे देशभरात मोफत कॉलिंगचा आनंद घेऊ शकता.
बीएसएनएल सुपरस्टार प्रीमियम प्लसमध्ये काय खास?सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये १५० एमबीपीएसचा हाय स्पीड आणि २००० जीबी डेटा दिला जात आहे. यामध्ये तुम्ही दररोज ६० जीबी पेक्षा जास्त डेटा वापरू शकता. तसेच, या प्लॅनमध्ये, तुम्ही फिक्स्ड कनेक्शनद्वारे देशभरात मोफत कॉल करू शकता.