नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातील भारत दूरसंचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन बाजारात आणला आहे. बीएसएनएल कंपनीने टेलिकॉम क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी 399 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान आणला आहे. या 399 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांना दररोज 3.12 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच, या प्लॅनची मर्यादा 74 दिवसांची आहे.
ग्राहकांना मिळणार एकूण 237.54 जीबी डेटासुरुवातीला 399 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर बीएसएनएलच्या ग्राहकांना दररोज 1 जीबी डेटा मिळत होता. मात्र, आता कंपनीने यामध्ये बदल करत अधिक डेटा वाढवून दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना दररोज 3.12 जीबी डेटा मिळणार आहे. या रिचार्जवर ग्राहकांना एकूण 237.54 जीबी डेटा वापरता येणार आहे. याआधी 74 जीबी डेटा मिळत होता.
अनलिमिटेड व्हॉइस कॉलसोबत SMSया प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा तर मिळणारच आहे. मात्र, यासोबत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा आहे. तसेच, ग्राहक दररोज 100 एसएमएस पाठवू शकतात. या रिचार्ज प्लॅनवर 31 जानेवारीपर्यंत दररोज 3.21 जीबी मिळणार आहे. याचबरोबर, बीएसएनएलने गेल्या काही दिवसांपूर्वी 365 दिवसांच्या मर्यादा असलेला 1312 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन वर्षभरासाठी असून यामध्ये ग्राहकांना 5 जीबी डेटा मिळणार आहे.