शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

डिजीलॉकर बनले नवीन 'आधार', आता तुमच्या पत्त्याचा नवीन पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 3:15 PM

DigiLocker : वेगवेगळ्या सरकारी योजनांमध्ये डिजीलॉकरशी लिंक केलेले आधार, वेगवेगळ्या सरकारी योजनांमध्ये पॅन एकच ओळख म्हणून वापरता येईल.

नवी दिल्ली : आता आधारसोबत लिंक केलेले डिजीलॉकर (DigiLocker) ओळख म्हणून वैध असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये डिजीलॉकरचा वापर वाढवण्याची घोषणा केली आहे. याच्या कागदपत्रांचा विस्तार केला जाणार आहे. आधारशी लिंक केलेले डिजीलॉकर पत्त्याचा पुरावा मानला जाईल. कागदपत्रे शेअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. वेगवेगळ्या सरकारी योजनांमध्ये डिजीलॉकरशी लिंक केलेले आधार, वेगवेगळ्या सरकारी योजनांमध्ये पॅन एकच ओळख म्हणून वापरता येईल.

DigiLocker चे फायदे काय आहेत?भारत सरकारने लोकांची महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी डिजीलॉकर अॅप बनवले आहे. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी हे अॅप सुरू करण्यात आले आहे. हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये तुम्ही कागदपत्रे वर्षानुवर्षे सेव्ह करून सहजपणे एका ठिकाणी ठेवू शकता. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या हार्ड कॉपी सतत तुमच्याजवळ ठेवण्याची गरज नाही. 

एकदा तुम्ही अॅपमध्ये डिजिटल दस्तऐवज सेव्ह केल्यानंतर, तुम्ही ते कुठेही वापरू शकता. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या डिजीलॉकर अकाउंटमध्ये जन्म प्रमाणपत्र, मार्कशीट आणि पासपोर्ट सारखी इतर महत्त्वाची कागदपत्रे देखील अॅड शकता. ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड अॅड करण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच ही कागदपत्रे  डिजीलॉकर अकाउंटमध्ये अॅड करता येतील.

डिजिटल इंडियावर सरकारचे लक्षदरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की सरकार लहान मुले आणि तरुणांसाठी डिजिटल लायब्ररी तयार करेल. याशिवाय पंचायत आणि वॉर्ड स्तरापर्यंत नॅशनल डिजिटल लायब्ररी सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर, डिजिटल तंत्रज्ञानाने शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. तसेच, राष्ट्रीय डेटा धोरण आणणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय, स्टार्टअपसाठीचा धोका कमी करण्याचाही प्रयत्न असणार आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात परिवहन पायाभूत सुविधांसाठी 75000 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. तसेच, पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणून वैध असणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानBudgetअर्थसंकल्प 2023Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन