Nokia नं CES 2022 मध्ये आपल्या प्रोडक्ट्सचा पेटारा उघडला आहे. कंपनीनं या इव्हेंटमध्ये बजेट स्मार्टफोन्स सादर केले आहेत. यात नोकिया सी-सीरीजच्या दोन तर नोकिया जी-सीरीजच्या देखील दोन फोन्सचा समावेश आहे. हे स्मार्टफोन्स Nokia C100, Nokia C200, Nokia G100 आणि Nokia G400 नावानं सादर करण्यात आले आहेत. सोबत Nokia 2760 Flip नावाचा एक फ्लिप फोन देखील लाँच झाला आहे. या लेखात आपण Nokia G100 आणि कंपनीच्या सर्वात स्वस्त 5G Phone Nokia G400 ची माहिती पाहणार आहोत.
Nokia G100 आणि Nokia G400 ची किंमत
Nokia G100 ची किंमत 149 डॉलर्स (जवळपास 11,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर रेंज Nokia G400 स्मार्टफोन 239 डॉलर्स (जवळपास 18,000 रुपये) मध्ये विकत घेता येईल. कंपनीनं या फोन्सच्या अमेरिकन उपलब्धतेची माहिती दिली आहे. परंतु Nokia G100 आणि Nokia G400 स्मार्टफोन्स जागतिक बाजारात कधी येतील, ही माहिती मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.
Nokia G100 आणि Nokia G400 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स
Nokia G100 मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, हा डिस्प्ले HD+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. कंपनीनं येत क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसरची ताकद दिली आहे. रॅम आणि स्टोरेजची माहिती मिळाली नाही. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. यात 5,000mAh ची बॅटरी आणि पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
Nokia G400 स्मार्टफोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5G Phone आहे. यात वॉटरड्रॉप नॉचसह 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 480 5G प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. सोबत 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. G400 मध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
हे देखील वाचा:
भन्नाट! रंग बदलणारा भारतातील पहिला स्मार्टफोन लाँच; 108MP कॅमेरा, 16GB रॅमसह आला Vivo चा शानदार फोन