Budget Earbuds: Truke नं भारतात AirBuds Lite आणि BTG3 हे दोन इयरबड्स सादर केले आहेत. दोन्हीमध्ये जवळपास एक सारखेच फीचर्स देण्यात आले आहेत. परंतु यांची डिजाइन वेगवेगळी आहे. दोन्हींची किंमत देखील 1399 रुपये ठेवण्यात आली आहे. यातील AirBuds Lite फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल तर BTG3 फ्लिपकार्टसह अॅमेझॉनवरून देखील विकत घेता येईल.
AirBuds Lite आणि BTG3 चे स्पेसिफिकेशन्स
BTG3 मध्ये हाय परफॉर्मन्स आणि एन्हांस्ड साऊंड क्वालिटीसह एक कस्टमाइज्ड गेमकोर चिपसेट देण्यात आला आहे. हे इयरबड्स एर्गोनोमिक इन-ईयर डिजाईनसह बाजारात आले आहेत. चार्जिंग केससह यात 48 तासांचा प्लेटाइम मिळतो. यातील 10mm 32Ω टाइटेनियम ड्रायव्हर्ससह यूनिक सिनेमॅटिक साउंड एक्सपीरियंस देतात. गोंधळ असलेल्या ठिकाणी देखील हे इयरबड्स एचडी क्वालिटी कॉलिंग देतात.
BTG 3 आणि AirBuds Lite दोन्ही इयरबड्समध्ये म्यूजिक आणि गेमिंग असे दोन मोड मिळतात. गेमिंग मोड लो लेटन्सी फीचर देतो. तर म्यूजिक मोडमध्ये कोणत्याही नॉइज विना म्यूजिक ऐकू शकतात. BTG3 दोन कलर व्हेरिएंट ब्लॅक आणि रेडमध्ये उपलब्ध होईल, तर AirBuds Lite ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध होईल.
हे देखील वाचा:
हॅकर्सच्या हातात आयतं कोलीत देऊ नका; UPI पेमेंट करताना या 5 चुका टाळा, नाही तर...
6000mAh असलेल्या Realme स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट; मर्यादित कालावधीसाठी ऑफर