भारतीय स्मार्टफोन बाजाराच्या बजेट सेगमेंटमध्ये शाओमी आणि रियलमी जास्त सक्रिय असल्याचे दिसून येते. परंतु लवकरच OPPO भारतात आपली ‘ए’ सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करणारआहे. OPPO A16 स्मार्टफोनची लाँच डेट समोर आली आहे. हा डिवाइस 20 सप्टेंबरला भारतीयांच्या भेटीला येणार आहे.
OPPO A16 चे प्रोडक्ट पेज शॉपिंग साईट अॅमेझॉन इंडियावर लाईव्ह झाले आहे. अॅमेझॉनवरील मायक्रोसाईटवर ओपो ए16 च्या लाँच डेट सोबत फोटो देखील शेयर करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून या फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा देखील झाला आहे. ओपो ए16 स्मार्टफोनच्या भारतातील किंमतीची माहिती 20 सप्टेंबरला समजेल. जागतिक बाजारात हा फोन 13 हजार रुपयांच्या आसपास सादर झाला आहे.
OPPO A16s चे स्पेसिफिकेशन्स
ओपो ए16एस स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.52 इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या फोनमध स्टॅंडर्ड रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट आणि पावरव्हीआर जीपीयू देण्यात आला आहे. हा ओप्पो फोन अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11.1 वर चालतो. हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो.
OPPO A16s च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए16एस मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.