आयव्हुमी कंपनीने आपला आय २ लाईट हा स्मार्टफोन आता नवीन आकर्षक रंगाच्या पर्यायात भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वीच आयव्हुमी आय २ लाईट हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. याला प्रारंभी मर्क्युरी ब्लॅक, सॅटन गोल्ड आणि मार्स रेड या तीन रंगात उपलब्ध करण्यात आले होते. आता याला नेपच्युन ब्ल्यू या नवीन आकर्षक रंगाच्या पर्यायात ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. आजपासून हे मॉडेल फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवर मूळ म्हणजेच ६,४९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे.
आयव्हूमी आय२ लाईट या मॉडेलमध्ये ५.४५ इंच आकारमानाचा आणि १४४० बाय ७२० पिक्सल्स (एचडी प्लस) क्षमतेचा तसेच १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात मीडियाटेकचा क्वॉड-कोअर ६७३९ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्ड वापरून वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
आयव्हूमी आय२ लाईट या मॉडेलच्या मागील बाजूस १३ आणि २ मेगापिक्सल्सच्या ड्युअल कॅमेर्यांचा सेटअप देण्यात आलेला आहे. यातील पहिल्या कॅमेर्यात सोनी कंपनीचे सेन्सर असून यामध्ये सॉफ्ट फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. या दोन्ही कॅमेर्यांच्या मदतीने अगदी सजीव वाटणार्या प्रतिमा घेता येतात. तर, यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. याच्या मदतीने सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसह फेस अनलॉक या फिचरचाही वापर करता येणार आहे. यामध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे.
आयव्हूमी आय२ लाईट या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स आहेत. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.