Tecno ब्रँड काही दिवसांपूर्वी भारतात खूप चर्चेत होता. कंपनीनं देशात ‘पॉप सीरीज’ अंतर्गत Tecno Pop 5 Pro लाँच केला होता. 6000mAh ची बॅटरी असलेल्या या फोनची किंमत कंपनीनं खूप कमी ठेवली होती. आता असाच एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन कंपनीनं मेक्सिकोमध्ये सादर केला आहे. Tecno Pop 5X नावानं आलेला हा फोन लवकरच भारतासह जागतिक बाजारात देखील सादर केला जाऊ शकतो.
Tecno Pop 5X ची किंमत
Tecno Pop 5X चा एकमेव व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. हा फोन क्रिस्टल ब्लू आणि कॉस्मिक शाईन रंगात विकत घेता येईल. यात 2GB RAM आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. मेक्सिकोमध्ये याची किंमत 115 डॉलर्स ठेवण्यात आली आहे. हा फोन जागतिक बाजारात कधी येईल याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.
Tecno Pop 5X चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Pop 5X मध्ये 6.5 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डॉट-नॉच डिस्प्ले 2.5D कर्व्ड ग्लास आणि 94% स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह सादर करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 गो एडिशनवर चालतो. हा फोन क्वॉडकोर UNISOC SC9832CE चिपसेटसह बाजारात आला आहे. सोबत 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्डनं वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलची एक प्रायमरी लेन्स आणि दोन QVGA सेन्सर देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये कंपनी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस-अनलॉक सिक्योरिटीची जबाबदारी सांभाळतात. तसेच पॉवरबॅकअपसाठी 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: